पुणे

ॲमेझॉनवर विका स्वतःची उत्पादने

CD

पुणे, ता. २५ : ॲमेझॉनवर उत्पादन विकायचे असेल तर त्याची प्रक्रिया काय आहे, नोंदणी कशी करावी, कागदपत्रे, किती दिवस लागतात, हे सर्व करून बिझनेस कसा वाढवायचा, ॲमेझॉनवर विक्री करण्यास किती खर्च लागतो, सेलर पोर्टल कसे असायला हवे आदींबाबत प्रात्याक्षिकासह मार्गदर्शन करणारी कार्यशाळा ३१ मे रोजी आयोजिली आहे. यात उत्पादन कसे लिस्ट करावे, डिलिव्हर करावे, रिटर्न्स असतील तर ते कसे हाताळावे, ॲमेझॉन ॲपवरती उत्पादन जास्तीत जास्त कसे दिसतील जेणेकरून विक्री वाढेल, सवलती कशा ठेवायच्या, उत्पादन स्पॉन्सर कसे करायचे, पेमेंट कसे पाहायचे, सपोर्ट कसा घ्यायचा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
संपर्क : ९३५६९७३४२७

ऑरगॅनिक किचन गार्डन
किचन गार्डन ही गार्डनिंग क्षेत्रातील एक प्रभावी आणि उपयुक्त संकल्पना असून याद्वारे पालेभाज्या, फळभाज्या व औषधी वनस्पती घरातच सेंद्रिय पद्धतीने पिकवता येतात. सध्या ताज्या, विषमुक्त आणि आरोग्यदायी भाजीपाल्याची मागणी वाढत आहे, परंतु बाजारात अशा भाजीपाल्याची शाश्वती देता येत नाही. घरच्याघरी भाजीपाला व शोभेची झाडे यावीत, अशी इच्छा असणाऱ्यांसाठी ही संधी खास आहे. २ जूनपासून सुरू होणाऱ्या पाच दिवसीय ऑनलाइन लेक्चर सिरीजमध्ये पुढील विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे: किचन गार्डन म्हणजे काय व त्याचे प्रकार, गार्डन लेआउट आणि नियोजन, पॉटिंग मिक्शचर, बियाणे निवड व रोपे तयार करण्याच्या पद्धती, झाडांसाठी सिक्रेट टिप्स, घरातील ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट तयार करण्याच्या आठ सेंद्रिय पद्धती, नैसर्गिक खतांद्वारे झाडांचे पोषण, पाण्याचा कार्यक्षम वापर, सेंद्रिय व इको-फ्रेंडली कीडनाशक उपाय. ही सिरीज घरच्याघरी बाग फुलवू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी उपयुक्त आहे .
संपर्क : ८४८४८११५४४

डिहायड्रेशन व्यवसाय प्रशिक्षण
निर्जलीकरण व्यवसाय संधींविषयी मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण थेट निर्जलीकरण उद्योग प्रकल्पात ७ व ८ जूनला आयोजिले आहे. यात निर्जलीकरण म्हणजे काय, या तंत्रज्ञानाचे महत्त्व, उपयोग, व्यवसाय म्हणून तो कसा करावा, निर्जलीकरणासाठीचे प्रमुख घटक, वेगवेगळ्या पद्धती, निर्जलीकरणाद्वारे तयार होणारे घटक पदार्थ व त्याचे उपयोग, उत्पादन व बाजारातील किंमत, मशिनरी, फ्लो चार्ट, बाजारपेठ, विपणन पद्धती, शासकीय योजना व अनुदान, प्रकल्पासाठी जागा, गुंतवणूक, प्रकल्प अहवाल इ.विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. फळभाज्या, पालेभाज्या, कंद, पानवर्गीय वनस्पती, आयुर्वेदिक वनस्पती, फळे, दुग्धजन्य पदार्थ, मांस, मच्छी, चिकन या पदार्थांचे प्रात्यक्षिक होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

ग्रामस्तर व्यवसाय विकास प्रशिक्षण
शेतमाल व अन्न प्रक्रिया, कुटीरोद्योग, गृहोद्योग, स्थानिक व नैसर्गिक संसाधनांवरील प्रक्रियाआधारित उद्योग इत्यादी विविध प्रकारचे उद्योग व व्यवसाय करण्यासाठी इच्छुक गावातील होतकरू, उद्यमशील युवावर्ग, महिला, शेतकऱ्यांच्यासाठी प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. गावामध्येच ग्रामपंचायत किंवा स्थानिक संस्थांच्या माध्यमातून या व्यावसायिक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यासाठी ‘सकाळ’ व ॲग्रोवन संलग्न प्रशिक्षण संस्था असलेल्या सिमासेस लर्निंग (SIILC)द्वारे ही प्रशिक्षण सेवा उपलब्ध केली जात आहे. गावामध्ये अशा प्रकारचे व्यवसाय विकास प्रशिक्षण आयोजित करण्याची तयारी असलेल्या ग्रामपंचायती तसेच स्थानिक संस्थांनी सिमासेस लर्निंगशी संपर्क साधावा.
संपर्क : ८९५६७१२६३१, ९३०७६४९०४७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day: शनिवार वाड्यावर कोणी फडकवला होता तिरंगा?फुकट चहा ते थिएटरमध्ये नारळ,15 ऑगस्ट 1947 ला पुणेकरांचा जल्लोष!

स्कुबा डायव्हिंग करताना अंकिता वालावलकरला झाली दुखापत, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'नाकातून रक्त येयला लागलं आणि...'

Latest Marathi News Live Updates : कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी शेतातच तिरंगा फडकावला

Pandit Nehru Speech Video : भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिन भाषणात काय बोलले होते पंडित नेहरू? व्हिडिओ पाहून म्हणाल जय हिंद!

Video : काळीज पिळवटणारी घटना! धोधो पाऊस अन् चालत्या गाड्यांवर कोसळलं झाड; जाग्यावर लोकांचा मृत्यू, धक्कादायक CCTV फुटेज व्हायरल

SCROLL FOR NEXT