पुणे

पुण्यातील विमान प्रवाशांचे हाल, खराब हवामानाचा फटका

CD

पुणे, ता. २५ ः दिल्लीमध्ये रविवारी दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. दिल्लीहून झेपावणारी काही विमाने रद्द झाली, तर दिल्ली विमानतळावर दाखल होणाऱ्या विमानांना दुसऱ्या विमानतळावर उतरविण्यात आले. पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या दहाहून अधिक विमानांना याचा थेट फटका बसला आहे. पुण्याहून दिल्लीच्या दिशेने जाणारी विमाने ही अमृतसर, वाराणसी, सुरत व मुंबई विमानतळावर वळविण्यात आली. खराब हवामानाचा फटका प्रवाशांना बसला.
दिल्लीतील वातावरण बिघडल्यामुळे पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या विमानांना उशीर झाला. काही विमानांचा मार्ग बदलण्यात आला, तर दिल्लीहून झेपावणारी १०० हून अधिक विमाने रद्द करण्यात आली. यामुळे दिल्लीसह पुणे विमानतळावर प्रवाशांची गर्दी झाली होती. शनिवारच्या मध्यरात्रीपासूनच विमानाचे वेळापत्रक बिघडले. रविवारीदेखील अशीच स्थिती होती. प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. ज्या विमानांचा मार्ग बदलला, त्या प्रवाशांना सर्वाधिक फटका बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Dowry Harassment Ruling : सासरच्यांनी सुनेला जुळवून घेण्यास सांगितल्यास गुन्हा दाखल होणार? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश

Latest Marathi News Live Update : अर्जुन खोतकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट

Blackmail case: महिलेसोबतच्या व्हिडीओवरून ब्लॅकमेल, बँक कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल; ६ जणांवर गुन्हा, चौघांना अटक

Farmer Protest: कांद्याला भाव नाही, शेतकरी आक्रमक! पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना घेतलं ताब्यात, चांदवडमध्ये रस्त्यावर रणकंदन

Kolhapur VIP Service: कोल्हापूरसह परराज्यातील तरुणींकडून व्हिआयपी सर्व्हिस, म्हैसाळमधील आलिशान बारवर छापा; नशेत धुंद तरुणांना घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT