पुणे

सहकारनगरमध्ये वाहनांची तोडफोड; टोळक्याची दहशत

CD

पुणे, ता. २७ ः तळजाई माता वसाहतीत पाच जणांच्या टोळक्याने वाहनांची तोडफोडकरून प्रचंड दहशत माजवली. वाहन तोडफोड करत असताना एकाने अडविण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्या अंगावर हत्यार ठेवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे.
या प्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात दीपक कुचेकर (वय ४३) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी अल्पवयीनांसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सोमवारी पहाटे घडला असून, यात रिक्षा तसेच दुचाकी अशा पाच वाहनांची तोडफोड करण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, पहाटे हे पाच जणांचे टोळके हातात हत्यारे व बांबू घेऊन आले. त्यांनी आरडाओरडा करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तक्रारदार यांच्यासह इतर वाहनांच्या काचा फोडल्या. रिक्षा तसेच दुचाकींचा यात समावेश आहे. दरम्यान, अचानक झालेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. नागरिक घराबाहेर आले. त्यातील तक्रारदारांनी आरोपींना विचारणा केली. नंतर त्यावरून त्यांच्यात वादविवाद झाला व टोळक्याने गोंधळ घालून दहशत माजवली. या वेळी एकाने तक्रारदाराच्या अंगावर हत्यार ठेवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur IT Park : अखेर मंत्रीमंडळ निर्णय झालाच! कोल्हापुरात शेंडा पार्कमध्ये 34 हेक्टर 36 गुंठे जागेत आयटी पार्क विकसित करण्यासाठी प्रस्ताव मंजूर

Mumbai News: सुरक्षा धर्मापेक्षा महत्त्वाची; विमानतळाजवळ नमाज पडण्याचा अधिकार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्णय

‘बायको पाहिजे’चं पोस्टर सोशल मीडियावर घालतंय धुमाकूळ; व्हायरल पोस्टर बॉय नेमका कोण ?

T20 WC, IND vs ENG SF: नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने! सूर्याने सांगितला आम्हाला हवं तेच झालं; Playing XI मध्ये बघा काय बदल झाला

Horoscop : उद्या 6 मार्चला 'या' 6 राशींचं नशीब चमकणार! अचानक मिळेल मोठी खुशखबर; आर्थिक लाभ संभवतो, नात्याला मिळेल नवी दिशा

SCROLL FOR NEXT