पुणे

कलाकाराने अनुभव, अनुभूतीचा मेळ घालावा

CD

पुणे, ता. ३० ः ‘‘कलाकाराचा प्रवास आपल्या आतल्या स्वराचा आर्त आवाज ऐकत जनतेसाठी गाणारी गाणी जनार्दनापर्यंत पोहोचणारा असावा. अनुभव आणि अनुभूती यांचा मेळ घालत कलाकाराने साधना करावी’’, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते सुरेश रानडे यांनी व्यक्त केली.
गानवर्धन संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या ‘सुचेता नातू स्मृती युवा पुरस्कारा’ने सतारवादक नेहा महाजन यांना सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे वितरण सुरेश रानडे आणि जयश्री रानडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. दहा हजार रुपये, शाल आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. याप्रसंगी संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, गानधर्वन संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर आदी उपस्थित होते.
पुरस्कार वितरणानंतर महाजन यांचे सतारवादन झाले. त्यांना विनायक कुडाळकर यांनी तबल्यावर साथसंगत केली. ‘‘खरेतर कलाकाराचे कौतुक कार्यक्रम झाल्यानंतर होते; पण माझ्या सादरीकरणाच्या आधीच तुम्ही मला पुरस्कार देऊन गौरविले आहे, यासाठी मी कृतज्ञ आहे’’, अशी भावना महाजन यांनी व्यक्त केली.
उत्तरार्धात पं. कैवल्यकुमार गुरव यांची गायन मैफील रंगली. राग भूपाळीतील बंदिशीने त्यांनी गायनाची सुरुवात केली. त्यानंतर ठुमरी सादर करून संत कबीरांच्या भजनाने मैफिलीची सांगता केली. त्यांना सुयोग कुंडलकर (संवादिनी), प्रशांत पांडव (तबला), चारुहास दामले, आदित्य जोशी (तानपुरा) यांनी साथसंगत केली. वासंती ब्रह्मे यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market: शेअर बाजारात नुकसान होतंय? सुरक्षित परताव्यासाठी 'या' 6 योजनांमध्ये करा गुंतवणूक

ऑस्ट्रेलियाला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या दिग्गज क्रिकेटरचं निधन, निवृत्तीनंतर १० वर्षांनी केलेलं पुनरागमन

Latest Maharashtra News Updates : दादर परिसरात जन्माष्टमी उत्सवादरम्यान महिलांनी दहीहंडी फोडली

CM Nitish Kumar : '5 वर्षात एक कोटी तरुणांना देणार सरकारी नोकऱ्या'; निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीशकुमार यांची मोठी घोषणा

iPhone 16 Pro Discount : आयफोन प्रेमींसाठी खुशखबर! iPhone 16 Pro मिळतोय 1 लाखाच्या आत, 'इतक्या' हजारांचा बंपर डिस्काउंट

SCROLL FOR NEXT