पुणे, ता. १७ : मराठ्यांचा गौरवशाली इतिहास आजच्या आणि पुढच्या पिढीला आवडेल, रुचेल आणि पटेल अशा पद्धतीने मांडावा या विचारातून जन्माला आलेला ऐतिहासिक गप्पागोष्टींचा कार्यक्रम म्हणजे ‘गोष्ट इथे संपत नाही’. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या सारंग भोईरकर आणि सारंग मांडके या दोन तरुणांनी एकत्र येऊन २०१७ मध्ये सुरू केलेल्या या कार्यक्रमाचा २००वा प्रयोग २८ सप्टेंबर रोजी होणार आहे.
२०१७ मध्ये पुण्यातून सुरू झालेला हा प्रवास बेळगाव, बंगळूर, इंदूर, देवास आणि इतर शहरांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. शिवचरित्रातील ‘अफजलखान वध’, ‘पन्हाळा ते पावनखिंड’ अशा परिचित गोष्टींपासून ते ‘दक्षिण दिग्विजय’, ‘शिवराज्याभिषेक’ या अल्पपरिचित विषयांपर्यंत तसेच ‘छत्रपती राजाराम महाराज’, ‘महाराणी ताराबाई’, ‘श्रीमंत थोरले बाजीराव पेशवा’, ‘पानिपत’ अशा एकूण १४ विषयांवर ‘गोष्ट इथे संपत नाही’चे प्रयोग सादर होतात.
गोष्टींबरोबरच समर्पक काव्यरचना आणि पूरक नकाशे, चित्रं यामुळे इतिहास रंजक आणि सोप्या पद्धतीने समोर येतो. नुकतेच ‘गोष्ट इथे संपत नाही’चे विशेष प्रयोग हिंदी आणि इंग्लिशमध्ये देवास आणि बंगळूर येथे सादर झाले. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आणि प्रेम लाभलेला हा कार्यक्रम आता द्विशतकाच्या उंबरठ्यावर आहे. प्रेक्षकांना विशेष आवडणारी शिवचरित्रातील गोष्ट अर्थात ‘अफजलखान वध’च्या २००व्या प्रयोगानिमित्त रसिकांसमोर सादर होणार आहे. या कार्यक्रमासाठी रावेतकर ग्रुपचे विशेष सहकार्य लाभले आहे.
हे लक्षात ठेवा
- २८ सप्टेंबर २०२५
- दु. १२.३० वाजता
- बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
- कार्यक्रमाची तिकिटे bookmyshow.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत किंवा दिलेला क्यूआर कोड देऊन कार्यक्रमाची तिकिटे आरक्षित करावीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.