पुणे

‘युगप्रवर्तक मोदी’ पुस्तकाचे रविवारी प्रकाशन

CD

पुणे, ता. १८ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनप्रवासावर आधारित भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांनी लिहिलेल्या ‘युगप्रवर्तक नरेंद्र मोदी- ७५ वर्षांची राष्ट्रसमर्पित जीवनकथा’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम रविवारी (ता. २१) सायंकाळी पाच वाजता शिवाजीनगर येथील गोखले अर्थशास्त्र संस्थेतील काळे हॉल येथे होणार आहे, अशी माहिती पुणे शहर भाजप सरचिटणीस पुनीत जोशी आणि लेखक विनायक आंबेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आंबेकर म्हणाले, ‘‘या पुस्तकात मोदी यांच्या जन्मापासून ते सप्टेंबर २०२५ पर्यंतचा प्रवास नोंदविण्यात आला आहे. वडनगरमधील बालपण, गुजरातमधील राजकीय वाटचाल, मुख्यमंत्रिपदाचा काळ तसेच राष्ट्रीय राजकारणातील प्रवास अशा विविध टप्प्यांची माहिती या पुस्तकात आहे. या वेळी अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद गिरी महाराज, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष धीरज घाटे उपस्थित राहणार आहेत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yoga for Diabetes: शुगर नियंत्रणात ठेवायचीय? फक्त 30 मिनिटांचा योगा करू शकतो कमाल! रोज करा 'ही' 5 योगासनं

आजचे राशिभविष्य - 22 नोव्हेंबर 2025

Weekend Breakfast Idea: हिवाळ्यात सकाळी नाश्त्यात झटपट बनवा आलू मेथी पराठा, सोपी आहे रेसिपी

Panchang 22 November 2025: आजच्या दिवशी भीमरूपी स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

अग्रलेख - मागच्या पानावरून पुढे...

SCROLL FOR NEXT