पुणे

‘मुळातून माणूस पुरस्कारा’चे सारद मजकूरतर्फे वितरण

CD

पुणे, ता. २९ : नात्यात आणि व्यवहारात पारदर्शकता असल्याने आमच्यात वाद होत नाहीत. वाद झालेच तर संवादातून गोष्टी सुकर होतात, अशी भावना रिक्षाचालक भावंडे भरत आणि महेश चोरघे यांनी व्यक्त केली.

‘सारद मजकूर’च्या वतीने दिला जाणारा ‘मुळातून माणूस पुरस्कार’ कलर कन्सेप्टचे संचालक सतीश पडे यांच्या हस्ते चोरघे भावंडांना प्रदान करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. एस. एम. जोशी हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात स्पेक्ट्रम प्रिंटरचे संचालक दीपक मेहता, रुद्र पब्लिशिंग हाउसचे नवनाथ जगताप, ‘सारद मजकूर’चे संचालक अभिजित सोनावणे उपस्थित होते. माणसातल्या माणूसपणाला सलाम करण्यासाठी ‘सारद मजकूर’तर्फे दर महिन्याला हा पुरस्कार देण्यात येतो.

महेश आणि भरत या दोघांनीही त्यांच्यात असलेले भावबंध उलगडले. एकमेकांच्या न पटलेल्या गोष्टी एकमेकांना सांगण्याची पद्धत, नात्यात आलेल्या चढ-उताराबद्दल, आलेल्या अडचणी आणि त्यातून एकमेकांच्या सोबतीने काढलेले मार्ग, एकमेकांचा एकमेकांना होत असलेला आधार यावरही त्यांनी भाष्य केले.

निर्व्यसनी, नम्र आणि सेवाभाव जपणारे रिक्षाचालक म्हणून त्यांची ओळख असल्याचे पडे यांनी सांगितले. माणुसकीला प्राधान्य देणारे, कामालाच दैवत समजणाऱ्या या दोघा भावांचा एकमेकांमधला समन्वय कौतुकास्पद आहे, अशी भावना दीपक मेहता यांनी व्यक्त केली. अमृता देसर्डा आणि रेणुका कल्पना यांनी दोघांशी संवाद साधला. तेजस्विनी गांधी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ODI World Cup 2025 Live Streaming: भारतात सुरू होतोय १२ वर्षांनंतर वर्ल्ड कपचा थरार! कुठे पाहाणार सामने? जाणून घ्या एका क्लिकवर

Nilesh Ghaiwal : निलेश घायवळ स्विर्झलंडमध्ये; ९० दिवसांचा मिळवला व्हिसा

lioness guard VIDEO : नवरात्रोत्सवात देवीच्या मंदिरासमोर चक्क सिंहिणीचा पहारा!

IND vs WI: भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी विंडीजला आणखी दुसरा मोठा धक्का; टीममध्ये केला बदल

२ तारखेला सोलापूर शहरातील वाहतूक मार्गात बदल! विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनी पारंपारिक वाद्याच्या गजरात निघणार मिरवणुका; ‘डीजे’ला बंदी, पोलिस आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT