पुणे, ता. २९ ः पुण्यातील श्री गजानन महाराज (शेगाव) सेवा प्रतिष्ठानने पूरग्रस्तांसाठी ‘सकाळ रिलिफ फंडा’कडे १ लाख ११ हजार रुपयांचा मदतीचा धनादेश ‘सकाळ’चे मुख्य कार्यपालन अधिकारी महेंद्र पिसाळ व ‘सकाळ रिलिफ फंड’चे समिती सदस्य डॉ. सतीश देसाई यांच्याकडे सुपूर्त केला. यावेळी मंदिर समितीचे संजय पोमण, अनंत खर्चे, प्रताप बाठे, पौर्णिमा पवार, योगेश पावसे व नरेंद्र बाकले उपस्थित होते.
मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरसह राज्यातील प्रभावित जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी ‘सकाळ रिलिफ फंडा’कडे राज्यभरातून दानशूर व्यक्ती सढळ हातांनी मदत करत असून, चौथ्या दिवशीही मदतीचा ओघ सुरू आहे. नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाण्याची परंपरा ‘सकाळ रिलिफ फंडा’ ने कायम ठेवत राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीकरिता समाजाला मदतीचे आवाहन केले आहे. ‘सकाळ रिलिफ फंड’ च्या आवाहनाला समाजातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
--------------------------------------
... यांनी केली सढळ हातांनी मदत
व्यक्ती - संस्था यांनी केलेली मदत (रुपयांमध्ये)
पन्नास हजार रुपयांची मदत ः विजयलक्ष्मी गायकैवारी व चारुलता पाटील यांनी प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत केली. मनीषा - विनायक येनगुळ व राधाकृष्णन नायर यांनी प्रत्येकी ५१ हजार रुपयांची मदत केली. याशिवाय राजेश गायकवाड यांनी २१ हजार रुपयांची मदत केली. डॉ. सोमीनाथ गोपाळघरे यांनी ३१ हजार रुपयांची मदत केली.
अकरा हजारांची मदत ः विनोद बिडवाईक, अशोक शिंदे, पुष्पलता बरके यांनी प्रत्येकी ११ हजार रुपयांची मदत केली, तर वृंदावन शहा - पल्लवी मेहता यांनी ११ हजार शंभर रुपयांची मदत केली. विजय किकले यांनी ११ हजार एकशे अकरा रुपयांची मदत केली. याशिवाय शशिकांत दिवाणजी यांनी ७ हजार पाचशे रुपयांची मदत केली.
दहा हजारांची मदत ः जालंधर सहाणे, शीतल सोलंकी, मंगेश पिंपळे, संगीता सपकाळ, सुहास पारगुंडे, माधुरी आपटे व सुचित्रा भावे यांनी मदत केली.
पाच हजार रुपयांची मदत ः बबन ठुबे, प्रभाकर ठुसे, सुधीर आपटे, अनिल नवरे, प्रदीप जाधव, डॉ. सुरेंद्र वझे, आशा शिंदे, अजिंक्य गवळी, मच्छिंद्र काशीद, नितीन आवटे, सिनीता प्रधान, वैशाली पुरोहित, समृद्धी पाटील, सुनीता पुंडे, सूरज माळी, विक्रमसिंह देशमुख, सतीश गायकवाड, स्वप्नील फरांदे, अर्चना देशपांडे, बापूराव घुगे, दिलीप भोईरकर, नंदकुमार कानडे, कुणबी समाज संघ, पुणे, श्रीमती तुळसाबाई पांडुरंग रामगडे प्रतिष्ठान, कन्हैयालाल जी. शहा चॅरिटेबल ट्रस्ट, आद्विक धारवटकर, वंदना - सतीश दिवेकर व के. पी. श्रॉफ यांनी मदत केली, तर कैलास चौधरी यांनी ५ हजार चारशे बत्तीस रुपयांची मदत केली.
तीन हजार रुपयांची मदत ः एकनाथ बुरसे, विनोद गुजर, राहुल अपसंगी, अॅड. निशांत मुडळे, प्रवीण देशपांडे राजेंद्र निंबर्गी व तेजपाल शहा यांनी मदत केली.
दोन हजार रुपयांची मदत ः
प्रकाशचंद्र खनके, प्रमोद तांगडपल्लीवार, अमर गारवे, कमलाकर आंबेटकर, सुनील कुऱ्हाडे व एकनाथ कदम यांनी मदत केली, तर सुधीर कामत यांनी २ हजार पाचशे रुपयांची मदत केली. याशिवाय बाळासाहेब जगताप, दिलीप गुरव, सतीश कोळपकर, शिशिर बोरकर धैर्यसिंग जाधव व चिन्मय पोतदार यांनी दोन हजार शंभर रुपयांची मदत केली.
एक हजार रुपयांची मदत ः
श्रीकृष्ण कुलकर्णी, मोहन भंडारे, सुरेश कामत, सचिन शेळके, श्रद्धा दीवाथे, संतोष मोरे, बिशमंभर गोयल, श्रीकांत वाघमारे, कमरुद्दीन भालदार, प्रशांत बिरदवडे, अजिंक्य पाटील, हनुमंत करपे, संजय देशपांडे, कृष्णा शिखरे, मारुती माने व शिवलिंगप्पा थामके यांनी
मदत केली. याशिवाय सुजित शहा, आनंदा बल्लाळ, मनीष केसरकर, केशव ठाकरे, विनोद पाटील व अविनाश मनुधने यांनी अकराशे रुपयांची मदत केली तर तुकाराम नलबिलवार यांनी १ हजार एकशे अकरा रुपयांची मदत केली.
पाचशे रुपयांची मदत ः
संजय सोनावणे, अपूर्वा चव्हाण, नीलेश महाडीक, डॉ. व्ही. जी. हेडाओ, अनुराधा नामजोशी व विनय कुलकर्णी यांनी मदत केली, तर अथर्व गंगापूरकर व संदीप पाटील यांनी अनुक्रमे पाचशे एक्कावन्न व सातशे रुपयांची मदत केली.
-----------------------------------
मदतीचे आवाहन
राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी समाजाला ‘सकाळ रिलिफ फंड’कडून मदतीचे आवाहन करण्यात येत आहे.
मदत करण्यासाठी:-
१. IDBI Bank
Name :- Sakal Relief Fund
A/C No: 45910010013026
IFSC: IBKL0000459
Branch :- Laxmi Road, Pune.
या खात्यावर देणगीची रक्कम ऑनलाइन पद्धतीने बँक ट्रान्स्फर करून देणगी देऊ शकता. देणगी बँक खात्यात ट्रान्स्फर केल्यानंतर८६०५०१७३६६ या व्हाट्सअॅप नंबरवर ट्रान्सझॅक्शन तपशील पाठवावेत.
२. मदतीचे धनादेश ‘सकाळ रिलिफ फंड’ या नावाने दैनिक ‘सकाळ’ च्या कार्यालयात ११ ते ५ या वेळेत स्वीकारले जातील.
‘सकाळ रिलिफ फंड’ साठीच्या देणग्या प्राप्तिकर कायद्याच्या ८० जी कलमांतर्गत प्राप्तिकर सवलतीस पात्र आहेत.
------------------------------------------
फोटो ः 55756, 55758, 55760, 55761
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.