पुणे

तब्बल साडेपाच लाख महिलांची तपासणी ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानांर्गत पुणे परिमंडळातील आकडेवारी

CD

पुणे, ता. २९ : ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाद्वारे गेल्‍या १३ दिवसांत ५ लाख ७० हजार महिलांची मोफत तपासणी करण्‍यात आली. यामध्‍ये उच्‍च रक्‍तदाब, मधुमेह, कर्करोग, गर्भवती, ॲनिमिया अशा विविध तपासण्यांचा समावेश आहे. या अभियानात ५५ हजार जणांना महात्‍मा फुले जन आरोग्‍य योजनेचे कार्ड वाटप करण्‍यात आले.
सध्‍या समाज माध्यमांवर मोफत सल्ला देणाऱ्यांचे अक्षरशः पीक आलेले आहे, त्यामुळे योग्य तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला मिळावा व त्‍यांचे जीवनमान उंचावले जावे, यासाठी हे अभियान महिलांसाठी उपयुक्‍त ठरत आहे. अभियानानुसार महिलांच्‍या आरोग्‍य तपासणीची सुरवात झाली असून, आतापर्यंत पुणे परिमंडळात (पुणे, सातारा, सोलापूर) ५ लाख ७० हजार महिलांची तपासणी झाल्‍याची माहिती पुणे परिमंडळाचे आरोग्‍य उपसंचालक डॉ. भगवान पवार यांनी दिली.
दरम्‍यान, गर्भवतींचीही तपासणी करण्‍यात येत असून, ५० हजार ५९२ महिलांना याचा लाभ झाला. तर, ॲनेमियासाठी २ लाख ६३ हजार, ७७ हजार २०० महिलांची क्षयरोगासाठी तपासणी केली गेली. तर, ३९ हजार बालकांना विविध आजारांवरील लसीचे डोसही दिले. यापैकी किती जणांना विविध आजारांचे निदान झाले. याबाबतची आकडेवारी एकत्र करण्‍याची कार्यवाही सुरू आहे.

या आजारांची होते आरोग्‍य तपासणी
या शिबीरात हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग या असंसर्गजन्य रोगाची तपासणी, रक्तअल्पता, पोषण मार्गदर्शन, स्त्रीरोग तपासणी व संदर्भ, ताणतणाव व्यवस्थापन, नैराश्य, चिंताविकार, सल्ला व मार्गदर्शन मानसिक आरोग्य व समुपदेशन आणि प्राथमिक प्रयोगशाळा तपासण्या, औषधोपचार, गंभीर आजार निदर्शनास आल्यास पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात येते.
........................
जिल्ह्यातील आकडेवारी
‘स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत २४ सप्‍टेंबरपर्यंत जिल्ह्यात १ हजार ८२९ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ७ हजार २३५ बालक, १० हजार १२३ गर्भवती, ११ हजार २६० महिलांची तपासणी करण्यात आली. पोषण समुपदेशन १७ हजार ८५८ , कर्करोग स्क्रीनिंग १७ हजार ७१३, सिकलसेल ॲनिमिया -८१, उच्च रक्‍तदाब १ लाख १ हजार १९१, मधुमेह ९६ हजार ६९४, नाक, कान, घसा आणि ज्येष्ठ महिला यांची ७ हजार २०६, क्षयरोग ११ हजार ५४४, हिमोग्लोबिनबाबत ५ हजार ३९० महिलांची चाचणी झाली. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री वयवंदना योजना २ हजार ६९, आयुषमान कार्ड ४ हजार ३५४ ओळखपत्राचा लाभ देण्यात आला आहे.
..........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaiwal : निलेश घायवळ स्विर्झलंडमध्ये; ९० दिवसांचा मिळवला व्हिसा

lioness guard VIDEO : नवरात्रोत्सवात देवीच्या मंदिरासमोर चक्क सिंहिणीचा पहारा!

IND vs WI: भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी विंडीजला आणखी दुसरा मोठा धक्का; टीममध्ये केला बदल

२ तारखेला सोलापूर शहरातील वाहतूक मार्गात बदल! विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनी पारंपारिक वाद्याच्या गजरात निघणार मिरवणुका; ‘डीजे’ला बंदी, पोलिस आयुक्तांचे आदेश

Career Horoscope 30th Sept: उद्या गजकेसरी राजयोग! मान-सन्मान आणि यशाची दारे उघडणार; 'या' राशींचे करिअर झेपावणार

SCROLL FOR NEXT