पुणे, ता. २९ ः ‘मुंढवा व केशवनगर भागातील नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वंकष विकास आराखडा (डीपीआर) तयार करा,’ अशा सूचना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या.
खासदार डॉ. कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदार संघातील हडपसर भागातील प्रश्नांसंदर्भात गुलटेकडी येथील निसर्ग कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. त्यानंतर डॉ. कोल्हे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालय येथे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम व विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या वेळी अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन, ओमप्रकाश दिवटे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी नगरसेवक योगेश ससाणे आदी उपस्थित होते. नागरिकांनी वाहतुककोंडी, कचरा, दूषित पाणी पुरवठा, इंधनविहीरीला येणारे दूषित पाणी यांसारखे विविध प्रश्न मांडले.
डॉ. कोल्हे यांनी बैठकीमध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र, अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. डॉ.कोल्हे म्हणाले, ‘‘शहरातील चारही दिशांना कचरा प्रकल्प होणार होते, त्याचे नेमके काय झाले ? हडपसर परिसरातच सर्व प्रकल्प कशासाठी ? शहराला नको असणारे प्रकल्प हडपसरला दिले जात आहेत. रामटेकडी येथे कचरा प्रकल्प असूनही तो सुरू नाही. होर्डिंग सुरक्षेसाठी काय व्यवस्था केलेली आहे का ?
दरम्यान, आयुक्त नवलकिशोर राम यांनी अधिकाऱ्यांना होर्डिंगचे सर्वेक्षण करून त्यावर केवळ फलक लावू नका, तर त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा, त्याचा अहवाल पाठविण्याचे आदेश दिले.
-------------
डॉ.कोल्हे म्हणाले
- सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्या
- सरकारने सामाजिक सलोखा केला पाहिजे, पण सरकार निवडणुकीच्या प्रचारातच
- लाडकी बहीण योजनेस येणाऱ्या अडचणी सरकारने सोडविल्या पाहिजेत
- क्रिकेटपेक्षा महाराष्ट्रातील पूरस्थितीचा प्रश्न गंभीर
- फडणवीसांच्या बेडरुमसाठी लाखो रुपये खर्च, मग शेतकऱ्यांना साडेतीन हजार रुपये कसे ?
- अहिल्यानगरमध्ये झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शांतता ठेवून कायद्याचे काम केले पाहिजे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.