पुणे

चटणी भाकरीवर दिवस काढतोय; पगार होणार कधी?

CD

पुणे, ता. ३० : ‘‘गेल्‍या नऊ महिन्‍यांचा पगार थकलाय. रुग्‍णालयापर्यंत येण्‍यासाठी गाडीभाडे नसल्‍याने पायी येतोय. घरभाडे द्यायला पैसे नसल्‍याने घरमालक राहू देईना. मुलांची शाळेची फी थकलीय. भाजी आणण्‍यासाठी पैसे नसल्‍याने दुपारचा डब्‍यासाठीही भाजीऐवजी चटणी घेऊन येतो व तीच सुक्‍या चपातीबरोबर खातो,’’ अशा व्‍यथा नऱ्हे येथील श्रीमती काशीबाई नवले रुग्‍णालयात काम करत असलेल्‍या परिचारिका, मावशी, मामा, तंत्रज्ञ व अशैक्षणिक कामे करणाऱ्या या कर्मचाऱ्यांनी मांडल्‍या.

गेल्‍या वर्षीच्‍या डिसेंबरपासून पगार थकल्‍याने रुग्‍णालयातील डॉक्‍टर वगळता सर्वच १६०० कर्मचारी हे २४ सप्‍टेंबरपासून रूग्‍णालयात कामबंद आंदोलन करत आहेत. रुग्‍णालयातील सर्वच रुग्‍णांना घरी सोडल्‍याने संपूर्ण रुग्‍णालयाचे कक्ष रिकामे पडलेले आहेत, तर, नवीन इमारतीच्‍या बाह्यरुग्ण विभागात सर्वच कर्मचारी हे आंदोलनाला बसलेले आहेत. यापैकी ७०० परिचारिका आहेत.

बिबवेवाडी येथे राहणाऱ्या व रुग्‍णांचे स्वच्छताविषयक कामे करणाऱ्या एक मावशी म्‍हणाल्‍या, ‘‘पैसे नसल्‍याने रुग्‍णालयाचे अर्धे अंतर पायी चालत येते. घरभाडे थकल्‍याने घर रिकामे करा असे घरमालक बजावत आहे. मुलगा बारावीला आहे, पण त्‍याची फी भरलेली नाही. सहा महिन्यांपूर्वी माझे पती गेले, मुलगा व एक मुलगी यांची सगळी जबाबदारी माझ्यावर आहे.’’
-----
‘‘सध्‍या सणासुदीचा काळ आहे. तो आम्‍ही साजरा करायचा नाही का? किराणावाला म्हणतो कशाच्या भरवशावर किराणा देऊ? मुलांना शाळेत बसून देत नाहीत. कर्ज १५ हजार घेतले, त्याला पाच महिने झाले, त्‍याचा हप्‍ता जात नाही. बँकेच्‍या नोटिसा आल्या त्‍यासाठी दागिने गहाण ठेवले. दुखले खुपले तर दवाखान्‍यात कसे जायचे हा प्रश्‍न आहे. काहींनी तर या विवंचनेत आत्महत्याही केली आहे. आम्‍हाला भविष्‍यनिर्वाह निधी नाही. आता आमच्या कष्टाचा पगार मिळावा,’’ असे परिचारिकांसह इतर कर्मचाऱ्यांनी सांगितले.
-----
पैसे मागतील या भीतीने नातेवाईकही बोलावेनात
समारंभात तर नातेवाईक बोलावत नाहीत, कारण त्‍यांना वाटते की, आम्‍ही त्‍यांना पैसे मागू, नवरात्र सुरू आहे, पण आम्‍ही कुठे जाऊ शकत नाहीत. हे सण आम्ही साजरे करायचे का नाही. सकाळी मुलीने १०० रुपये मागितले तर केवळ ३० रुपये तिच्‍या हातात दिले, याबद्दल खूप वाईट वाटते, अशा भावना कर्मचाऱ्यांनी व्‍यक्‍त केली.
----......
परिचारिकांचा एक महिन्‍याचा पगार केला असून, उरलेला सर्वांचा करणार आहे. महिन्याला ५ ते ८ कोटी पगारावर खर्च होतात. रुग्‍णालयाच्‍या सेवा जवळपास मोफत आहेत. आमची शासनाकडून कोट्यवधी रुपयांची मुलांची शिष्‍यवृत्‍ती आलेली नाही. महाविद्यालयात मुलींचे नवीन प्रवेश झाले आहेत, ते पैसे सरकार देणार असल्‍याने त्‍यांच्‍याकडून पैसे घेता येत नाहीत. दुसरीकडे त्‍यांची फी शासनाकडूनही येत नाही. सर्व रुग्‍णांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे, परंतु, टप्‍प्‍याटप्‍प्‍याने सर्वांचा पगार करण्‍यात येईल. कोणाचाही एक रुपया बुडविला जाणार नाही.
-डॉ. अरविंद भोरे, वैद्यकीय संचालक, काशीबाई नवले रुग्‍णालय
................
PNE25V56363

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ODI World Cup 2025: भारतीय संघाची विजयाने दणक्यात सुरुवात! दीप्ती शर्मा - स्नेह राणाची फलंदाजीपाठोपाठ गोलंदाजीतही कमाल

भीमा नदीतील पाण्यामुळे सीनेचा पूर ओसरेना! सोलापूर-विजयपूर महामार्ग आजही बंदच राहणार; उजनी धरणातून ३ महिन्यात सोडले २०० टीएमसी पाणी

मोठी बातमी! ‘मकोका’ची कारवाई टाळण्यासाठी मागितली ६५ लाखांची खंडणी! कोल्हापुरातील सहायक फौजदारासह 5 जणांवर अकलूज पोलिसांत गुन्हा, दोघे अटकेत

Attacked on Ex Minister in Jail : खळबळजनक! माजी मंत्र्यावर तुरुंगात जीवघेणा हल्ला; डोक्याला गंभीर इजा!

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राची आकांशा नित्तूरे दुसऱ्या फेरीत; दिव्या भारद्वाजचीही आगेकूच

SCROLL FOR NEXT