पुणे

आमदार बापू पठारे यांना लोहगावात धक्काबुक्की

CD

वडगाव शेरी, ता. ४ ः लोहगावमधील रखडलेल्या विकास कामासंदर्भात आंदोलन करण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन गटांमध्ये वादावादी झाली. त्याचे रूपांतर धक्काबुक्कीत आणि झटापटीत झाले. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बापू पठारे यांना धक्काबुक्की करण्यात आली. दरम्यान, उशिरापर्यंत विमानतळ पोलिसांनी याबाबत कोणताही गुन्हा दाखल केला नव्हता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगाव येथील गाथा लॉन्स येथे एका सेवापूर्ती समारंभानिमित्त आमदार बापू पठारे आणि लोहगाव येथील कार्यकर्ते बंडू खांदवे उपस्थित होते. लोहगाव येथील विविध रस्त्यांची कामे रखडल्याच्या मुद्यावरून पठारे आणि खांदवे यांच्यात या कार्यक्रमादरम्यान बाचाबाची आणि धक्काबुक्की झाली.
ही बातमी पसरल्यानंतर दोन्ही गटाचे समर्थक कार्यक्रम स्थळी जमले. दोन्ही गटाच्या समर्थकांनी एकमेकांना शिवीगाळ केली. पोलिसांनी हस्तक्षेप करीत दोन्ही गटाच्या समर्थकांना दूर केले. या ठिकाणावरून पठारे निघाल्यानंतर बंडू खांदवे यांनी पुन्हा त्यांची गाडी अडवून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना बाजूला केले. मध्यरात्रीपर्यंत पठारे आणि खांदवे यांपैकी कोणीही तक्रार दिली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी कोणताही गुन्हा मध्यरात्रीपर्यंत दाखल केला नाही.
पोलिस निरीक्षक गोविंद जाधव म्हणाले, ‘‘किरकोळ बाचाबाची झाली. खबरदारीचा उपाय म्हणून लोहगावमध्ये पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. दोन्ही गटांना शांत केले आहे. दोघांनी मारहाण झाल्याचा दावा केलेला असला तरी असा कोणताही प्रकार घडलेला नाही.’’
आमदार पठारे म्हणाले, ‘‘आज झालेल्या प्रकार म्हणजे संबंधितांचा केवळ राजकीय स्टंट आहे. महापालिका निवडणुका जवळ आल्यामुळे ते स्टंटबाजी करत आहेत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT