पुणे

किचन गार्डन कार्यशाळा

CD

पुणे, ता. ७ : किचन गार्डनद्वारे भाजीपाला, सक्युलंट्‍स व कॅक्टस, फॉलिएज व फुलझाडांची तसेच इतर फळझाडांची लागवड करता येते. रोजच्या खाण्यात ताजा आणि विषमुक्त भाजीपाला व शोभेची इतर झाडे घरच्या घरी कशी लावू शकतो याविषयी सखोल मार्गदर्शन करणारी कार्यशाळा ११ व १२ ऑक्टोबरला आयोजिली आहे. घरातल्या घरात लागवड केलेल्या सेंद्रिय भाज्यांचे आरोग्यदायी फायदे, शिवाय वर्षभर बाग फुललेली कशी राखावी, बागेचे आर्थिक गणित कसे बसवावे, बागेचे नियोजन व डिझाइन, लागवडीसाठी आवश्यक गोष्टी, रोपांची निवड, माती व मातीविरहित लागवड करण्याची पद्धत, खत व पाणी व्यवस्थापन, रोग व कीड नियंत्रणाविषयी माहिती दिली जाणार आहे. राष्ट्रीय पातळीवर काम करणारे अनुभवी तज्ज्ञ कार्यशाळेला मार्गदर्शन करणार आहेत.

ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट
अभ्यासक्रम माहिती सत्र
सर्वाधिक रोजगाराच्या संधी असणाऱ्या कृषी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी एक वर्षाचा ‘पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट’ हा अभ्यासक्रम लवकरच सुरू होत आहे. इंडस्ट्री तज्ज्ञांनी तयार केलेल्या या अभ्यासक्रमाद्वारे ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांच्यात उद्योजकता विकास निर्माण करण्यावर तसेच ज्यांना नोकरी ही प्राथमिकता आहे अशांमध्ये उत्तम नोकरी मिळविण्याचे कौशल्य निर्माण करण्यावर भर दिला जातो. कृषी व संलग्न वा अन्य कोणत्याही विषयातील पदवी पूर्ण केलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र आहेत. गरजू विद्यार्थ्यांना ६० हजारांपर्यंत शिष्यवृत्ती मिळविण्याची संधी उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती, अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरच्या करिअर संधी, स्टार्टअपच्या संधी अशी सर्व प्रकारची माहिती देणारे विनामूल्य सत्र १२ ऑक्टोबरला सकाळी ११.३० वाजता आयोजिले आहे.

मेडिकल कोडिंग प्रमाणपत्र प्रशिक्षण
वैद्यकीय क्षेत्रात करिअरसाठी मेडिकल कोडिंग हे तीन महिन्यांचे प्रमाणपत्र प्रशिक्षण एसआयआयएलसी व टेक महिंद्रा यांच्या वतीने २५ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. यामध्ये सीपीसी (सर्टिफाइड प्रोफेशनल कोडर) प्रमाणपत्र तयारीचे मार्गदर्शन तसेच केपीओ (नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग) व बीपीओ (बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग) साठीचे मार्गदर्शन होणार आहे. मेडिकल शब्दावलीची ओळख, मेडिकल सेवाभाषेची समज, शरीर विज्ञान आणि शारीरिक रचना, कोडिंग प्रणाली : आयसीडी-१०, सीपीटी आणि एचसीपीसीएस कोडिंग, वैद्यकीय सेवा नियमावली (एचआयपीएए), कोडिंग नियम व मार्गदर्शक तत्त्वे, कोडिंग सराव इ. चा समावेश आहे. विज्ञान विषयातील २१ ते २५ वयोगटांतील पदवीधारक, व्यावसायिक, मेडिकल कोडिंगमध्ये करिअर करू इच्छिणारे प्रवेशास पात्र आहेत.

वास्तुशास्त्र नियोजनाविषयी कार्यशाळा
वास्तुशास्त्रानुसार घर, कार्यालय वा दुकान कसे असावे इ. बाबत माहिती करून देणारी ऑनलाइन कार्यशाळा २७ ऑक्टोबरपासून आयोजिली आहे. घर, वास्तू दोषमुक्त असावी ही इच्छा बाळगणाऱ्यांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त आहे. कार्यशाळेत वास्तुशास्त्र काय आहे, वास्तूदोष कोणते आहेत, त्याचे परिणाम कोणाला जाणवतात, दिशा, उपदिशा, अधिपती देवता आणि पंचतत्त्व, दिशा आणि प्रभाव, वास्तुपुरुष मंडल, मर्मस्थान, उपमर्मस्थान, जमीन कशी निवडावी, घर नक्की कोठे व कसे बांधले पाहिजे, घर बांधण्यास प्रारंभ कसा करावा, घरातील अंतर्गत रचना कशी असावी, मुख्य दरवाजाची दिशा ओळखणे, दरवाजा कोठे करावा, वास्तूचे आयुष्य आदींबाबत मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ९३५६९७३४२७, ८९५६३४४४७२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Road Accidents Reduction : २०३० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी होणार? ; राज्यसभेत गडकरींनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

Pune Mumbai Expressway Traffic : द्रुतगती मार्गावरील अपघाताचा फटका; पुणे-बंगळूर महामार्गावर अवजड वाहतूक ठप्प

T20 World Cup: इशान किशनच ओपनर! सूर्याचा विश्वास पठ्ठ्याने सार्थ ठरवला, 7 Six अन् फिफ्टी; संजूचे स्थान धोक्यात

Pune Crime : मैत्रिणीला फोन केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला

Jan Arogya Yojana : राज्‍यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्‍य केंद्रातही महात्‍मा फुले योजना; आता बाह्यरुग्ण विभागातील उपचारही मिळतील मोफत

SCROLL FOR NEXT