आज पुण्यात २९ मार्च २०२५ शनिवारसाठी
......................................................
सकाळी ः
प्रदर्शनाचे उद्घाटन ः विंटेज अँड क्लासिक कार क्लब ऑफ इंडिया आयोजित ः विंटेज व क्लासिक कार्स प्रदर्शन ः उद्घाटन हस्ते- योहान पूनावाला ः रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब, रेस कोर्स ः १०.००.
पुरस्कार वितरण ः डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ अप्लाइड आर्टस अँड क्राफ्ट्स, आकुर्डी व स्कूल ऑफ अप्लाइड आर्टस अँड क्राफ्ट्स, डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, आकुर्डी आयोजित ः डॉ. डी. वाय. पाटील जीवनगौरव पुरस्कार ः पुरस्कारार्थी- शि. द. फडणीस ः
बालगंधर्व कलादालन, शिवाजीनगर ः ११.००.
समारोप समारंभ ः शिवशंभू राजे प्रतिष्ठान, शिवभूमी भ्रमंती ग्रुप, विश्व हिंदू परिषद बजरंग दल उत्तमनगर आयोजित ः धर्मवीर छत्रपती श्री शंभू महाराज ३३५वी पुण्यतिथी, बलिदान मास समारोप ः श्री कोंढवेश्वर महाअभिषेक व पूजा ः हस्ते- योगी निरंजननाथ ः भजन ः मूकपदयात्रा ः कीर्तनसेवा- पुरुषोत्तम महाराज पाटील ः श्री कोंढवेश्वर मंदिर प्रांगण, कोंढवे धावडे ः ४.००.
सायंकाळी ः
पुरस्कार वितरण व कविसंमेलन ः अखिल भारतीय साहित्य परिषद (साहित्यभारती) आयोजित कुटुंब प्रबोधन निबंध व कथा स्पर्धेचे पुरस्कार वितरण ः हस्ते- संजय कुलकर्णी ः खुले कविसंमेलन ः सहभाग- धनंजय तडवळकर, निरुपमा महाजन, मिलिंद जोशी, रूपाली अवचरे, प्रसन्नकुमार धुमाळ ः भारतीय विचार साधना सभागृह, टिळक रस्ता, सदाशिव पेठ ः ५.००.
सांगीतिक कार्यक्रम ः दिशा २०२५ व अंतर्नाद कला साधना आयोजित ः पाण्यासाठी जागरूक व संवेदनशील नाते जोडणारा- ‘पाण्यासाठी...एक साद! गाण्यांची मैफील ः सहभाग- गौरी बापट, अनुजा गाडे, प्रिया अय्यर, अनघा पाठक ः गणेश सभागृह, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रस्ता ः ५.३०.
उद्घाटन सोहळा ः तीन दिवसीय बहारदार नाट्यसंगीत महोत्सव ः महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे बालगंधर्व संगीत रसिक मंडळ आयोजित ः उद्घाटन- विजयकांत कुलकर्णी, सुरेश साखवळकर व पांडुरंग मुखडे ः सहभाग- नीलाक्षी पेंढारकर, ज्ञानेश पेंढारकर, मुकुंद मराठे, संपदा थिटे, सानिया पाटणकर आणि सुरेश साखवळकर ः भरत नाट्य मंदिर, सदाशिव पेठ ः ५.३०.
वर्धापन दिन ः इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ आयोजित ः सातवा वर्धापन दिन ः सोबतीने सुखासुखी ः उपस्थिती- डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ. शिरीषा साठे ः सहभाग- डॉ. उमा कुलकर्णी, डॉ. आशिष बाभूळकर, सायली साठे, निरंजन पंडित व आभा अमला अभिजित ः प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सभागृह, मॉडर्न कॉलेज, शिवाजीनगर ः ६.००.
गप्पागोष्टी व भेटीगाठी ः मनोबल आयोजित ः वर्धापन दिनानिमित्त- मृणाल कुलकर्णी, वैभव निंबाळकर व निपुण धर्माधिकारी यांच्यासोबत गप्पा ः उपस्थिती- विजय बाविस्कर, चित्रा व हेमाद्री बुझरूक, चंद्रशेखर शेठ, शैलेश शहा, भाऊसाहेब जाधव ः मोरेश्वर सभागृह, करिष्मा सोसायटीजवळ, कोथरूड ः ६.००.
व्याख्यान ः सहजीवन व्याख्यानमाला ः विषय- मी पहारेकरी ः वक्ते- भाऊ तोरसेकर ः मुक्तांगण बालरंजन केंद्र, सहकारनगर ः ७.००.
...................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.