- राधिका वळसे पाटील
‘स्मार्ट होम’ ही संकल्पना पाश्चात्त्य देशांत रूढ झाली असून भारतातही आता तिचा अवलंब केला जात आहे. अनेक कुटुंबे आपापल्या गरजेनुसार घर स्मार्ट करण्याकडे वळत आहेत. ‘अलेक्सा’, ‘ओके गुगल’ अशा व्हॉइस कमांडच्या आधारे घरातील उपकरणांना हाताळण्याची सुविधा नागरिक घेत आहे. प्रगत तंत्रज्ञान आणि नवकल्पनांमुळे आता असंख्य प्रकारची स्वयंपाकघर उपकरणे हवी असलेली कामे काही सेकंदात करतात. एकप्रकारे स्वयंपाकघर अपग्रेड करतात. गुढी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक सण असल्यामुळे त्यानिमित्ताने ग्राहक आवर्जून स्वंयपाकघरासाठी ‘अपग्रेड’ उपकरणांची आवर्जून खरेदी करतात. त्यामुळे डिशवॉशर, डबलडोरफ्रिज, रोटी मेकर, स्वतंत्र पिठाच्या गिरण्या, कॉफी मेकर, बॉयलर, फूड प्रोसेसर, ब्लेंडर आदींना मागणी वाढली आहे.
वेळेची बचत करणारी साधने
रोटी मेकर ः पोळपाट लाटण्यावरून आता घरातील चपाती बनवण्यासाठी रोटी मेकर बाजारात आले आहेत, हे तुम्हाला काही मिनिटात गोल चपाती बनवून देतात. पीठ मळणे, लाटणे, शेकणे ही तिन्ही कामे आता एकच मशिन होत आहेत. यात फक्त चपातीच नाही, तर पराठे, थालिपीठ, खाकरा असे विविध पदार्थ बनवता येतात.
मिक्सर ग्राइंडर ः पारंपरिक पाट्या-वरवंट्यापासून ते आधुनिक घरगुती मिक्सरपर्यंत मर्यादित असलेल्या नागरिकांसाठी आता तीक्ष्ण ब्लेडसह सुसज्ज असलेले मिक्सर ग्राइंडर उपलब्ध झाले आहेत. ज्याचा उपयोग काळी मिरी, लवंगा त्याचबरोबरीने चटण्या, आइस्क्रीम आणि मसाले इत्यादीसारख्या कठीण घटकांना बारीक एकदम पावडर सारखे करतात.
ज्यूसर ः भाज्या आणि फळांचा रस काढण्यासाठी याचा वापर केला जातो. नवीन, अद्ययावत पद्धतीने कमी श्रमात, खास डिझाइन केलेले ब्लेड आणि वेग नियंत्रणांसह सुसज्ज आहे.
कॉफी मेकर ः कॉफीमेकर हे वेळ वाचविण्याचे अंतिम साधन आहे. फक्त एका बटणावर कॉफी तयार होते. त्यामुळे नागरिकांच्या वेळेची बचत होऊन
२ मिनिटांत कॉफी करता येत आहे.
सँडविच मेकर आणि ग्रिलर सँडविच मेकर ः सँडविच मेकर त्याच्या कॉम्पॅक्ट डिझाइन आणि जलद सेवा देण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे. ग्रिलर, मास, भाज्या आणि बरेच यावर ग्रिल करता येते.
डिशवॉशर ः जेवणानंतरच्या साफसफाईच्या कामाचा ताण कमी करण्यासाठी हे उपकरण महत्त्वाची भूमिका निभावते. वापरण्यास अत्यंत सोपे असून, अस्वच्छ ताट, थाळी स्वच्छ करण्याचे काम एका बटणवर होते.
स्वयंपाक घरातील उपकरणांची विक्री ही हंगामी असून, सणासुदीला गृहोपयोगी वस्तूंना जास्त मागणी असते. महिलांची पसंती ही आधुनिक आणि विविध सुविधा देणाऱ्या उपकरणांना असते. सण असल्यामुळे आमच्याकडे ९० टक्के उपकरणांवर सवलत देण्यात आली आहे.
- महेश यादव, व्यावसायिक
़
विविध गृहोपयोगी उपकरणे घेण्यासाठी बाजारात नागरिकांची गर्दी वाढली आहे. बऱ्याच उपकरणांमध्ये आधुनिकता आणि सहजता आल्यामुळे नागरिक त्यांना प्राधान्य देतात. नागरिकांची पसंती आता डबल डोअरफ्रिज, मिक्सर ग्राइंडर, फूड प्रोसेसर, रोटी मेकर याला दिसत आहे.
- प्रदीप पवार, व्यावसायिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.