पुणे

पहिला गोंदण पुरस्कार आमटे दांपत्याला जाहीर

CD

पुणे, ता. २८ : प्रख्यात समाजसेवक डॉ. मंदाकिनी व डॉ. प्रकाश या आमटे दांपत्‍याला ‘ऑटो-इम्यून ब्लिस्टरिंग डिसीज फाउंडेशन’(एआयबीडीएफ)ने पहिला ‘गोंदण’ पुरस्कार जाहीर केला आहे. यावेळी आमटे दांपत्याच्या प्रकट मुलाखतही होईल, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अशोककुमार सुरतवाला यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी फाउंडेशनचे विश्वस्त डॉ. शरद मुतालिक, अनिरुद्ध बंबावाले, जयंत हेमाडे, विजय नांदगावकर आदी उपस्थित होते.
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या हस्ते येत्या बुधवारी (ता. २ एप्रिल) सायंकाळी ६.३० वाजता डेक्कन जिमखान्यातील कार्यक्रमात आमटे दाम्पत्याला प्रदान करण्यात येईल. निवेदक प्रवीण जोशी त्यांची प्रकट मुलाखत घेतील. हा कार्यक्रम केवळ निमंत्रितांसाठी आहे.
त्वचा आजारांकडे समाज आजही तुच्छतेने पाहतो. त्यामुळे अशा रुग्णांना आजारासोबत अन्य अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना आर्थिक व सामाजिक संघर्षाला सामोरे जावे लागते. अशावेळी त्वचेच्या आजारांबाबत जागृती करून ‘ऑटो-इम्यून ब्लिस्टरिंग’ आजारांनी ग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी आम्ही सुरू केलेला हा सामाजिक उपक्रम आहे, अशी माहिती डॉ. मुतालिक यांनी दिली.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandoli National Park : चांदोली जंगलात वाघांचे अस्तित्व वाढले; गवे, डुकरं बदलताहेत अधिवास, वनविभाग कोणतं पाऊल उचलणार?

Babar Azam घरगुती वाघ! PSL मध्ये शतक झळकावून केली विराट कोहली, अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी; रोहितला मागे सोडले

Mumbai News: वाहतूक नियम तोडणाऱ्यांसाठी वाईट बातमी! ‘वन नेशन, वन ई-चालान’ महाराष्ट्रात लागू; नियमभंग केला तर थेट दंड

कुर्डुवाडीच्या प्रियांतिकाची सिनेसृष्टीत दमदार एंट्री! ‘फुला’ चित्रपटातून मांडली मुरळीच्या जगण्याची वेदना; चित्रपटाचे क्रिएटिव्ह डिरेक्टर अमर देवकर बार्शीचे, वाचा...

ICSE and ISC Result : ‘आयसीएसई’चा ९९.१८ टक्के, तर ‘आयएससी’चा ९९.१३ टक्के निकाल; ‘सीआयएससीई’तर्फे दहावी-बारावीचे निकाल जाहीर

SCROLL FOR NEXT