पुणे

विमानतळाचा उन्हाळी हंगाम जाहीर

CD

पुणे, ता. २८ ः पुणे विमानतळाचा यंदाचा उन्हाळी हंगाम रविवारी (ता. ३०) जाहीर झाला. यात नवीन शहरांसाठी विमानसेवा जाहीर झालेली नाही. याशिवाय विमानांच्या वाहतुकीतही वाढ झालेली नाही.
हा हंगाम हिवाळी हंगामासारखाच असेल. उन्हाळी हंगामाच्या पहिल्या दिवशी १०२ उड्डाणे व तेवढीच ‘लँडिंग’ अशी एकूण २०४ विमानांची वाहतूक झाली. विमानतळाचे नवे ‘टर्मिनल’ पूर्ण क्षमतेने सुरु झाल्यानंतरचा हा पहिला उन्हाळी हंगाम आहे. नव्या ‘टर्मिनल’ची प्रवासी वहन क्षमता जास्त आहे. त्यामुळे विमानांची संख्या वाढण्याची अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली आहे.
याशिवाय जुने ‘टर्मिनल’ कार्यान्वित असताना उपलब्ध होते तेवढेच ‘स्लॉट’ उन्हाळी हंगामात उपलब्ध झाले आहेत. धावपट्टीचे विस्तारीकरण व ‘पार्किंग बे’ची संख्या वाढल्याशिवाय ‘स्लॉट’ची संख्या वाढणे अवघड आहे. नवे व जुने टर्मिनल एकत्र झाल्यास प्रवाशांना सामावून घेण्याच्या क्षमतेत वाढ होईल.
------------
३४ शहरांसाठी सेवा
पुण्याहून सध्या ३४ शहरांसाठी विमानसेवा सुरु आहे. यात वाराणसी , चेन्नई, बंगळूर, दिल्ली, लखनौ, नागपूर, हैदराबाद अशा प्रमुख शहरांचा समावेश आहे. यंदा उन्हाळी हंगामात वाराणसीसाठी स्पाईस जेटने सेवा दिली आहे. यापूर्वी इंडिगोने याच शहरांसाठी सेवा सुरु केली आहे.
---------------
विमानतळ प्रशासनाने दैनंदिन वाहतुकीसाठी विमान कंपन्यांकरीता जास्त ‘स्लॉट’ उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. २१८ पैकी २०८ ‘स्लॉट’ आरक्षित झाले आहेत. उर्वरित १० ‘स्लॉट’ सुद्धा आरक्षित व्हावेत यासाठी विमान कंपन्यांशी चर्चा सुरु आहे.
- संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT