पुणे, ता. ३० : सूक्ष्मजीव, जीवाणूंच्या संशोधनासाठी कार्यरत राहिलेले तसेच दोन लाख जिवाणूंचा संग्रह असलेला ‘नॅशनल सेंटर फॉर मायक्रोबिअल रिसोर्स’ (एनसीएमआर) हा प्रकल्प बंद होणार आहे. हा प्रकल्प २००८ पासून सूरू होता. पुण्यातील राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्रांतर्गत (एनसीसीएस) आणि केंद्र सरकारच्या जैव तंत्रज्ञान विभागाच्या (डीबीटी) तसेच आर्थिक सहकार्यातून तो गेली १७ वर्षे सुरू होता.
सुरवातीला मायक्रोबिअल कल्चर कलेक्शन (एमसीसी) म्हणून सूक्ष्मजीव संकलन आणि नंतर संवर्धनाचा प्रकल्प राबवण्यात आला. २०१७ मध्ये प्रकल्पाचा विस्तार करून त्याचे ‘एनसीएमआर’ मध्ये रूपांतर झाले होते. त्यानंतर त्यास दोन वेळा मुदतवाढ मिळाली होती.
गंगेच्या संपूर्ण प्रवाहाचा पहिला सूक्ष्मजीवशास्त्रीय अभ्यास, प्रतिजैविकांना न जुमानणाऱ्या सूक्ष्मजीवांचे संकलन आणि संवर्धन, सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान गोदावरीच्या पाण्यातील जिवाणूंचे सर्वेक्षण आदी स्वरूपाचे संशोधन या प्रकल्पात करण्यात आले होते. यापुढेही हा प्रकल्प सुरू राहावा तसेच संशोधक आणि उद्योगांना प्रकल्पाच्या सुविधा मिळाव्यात अशी शास्त्रज्ञांची इच्छा आहे.
याबाबत ‘एनसीएमआर'' चे माजी प्रमुख डॉ. योगेश शौचे म्हणाले, या प्रकल्पाची सुरवात करताना भारतीय उपखंडातील सूक्ष्मजीवांचा कायमस्वरूपी संग्रह करण्याची योजना ‘डीबीटी’ने आखली होती. आता केंद्र बंद होणार असल्याने या जीवाणूंचे पुढे काय होणार याबाबत स्पष्टता नाही. तूर्त ‘कल्चर कलेक्शन’ प्रक्रिया तरी बंद होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.