पुणे

घराच्या झडतीत ५१ लाखांची रोकड जप्त दोन कोटी रुपयांच्या लाच प्रकरणी पोलिस उपनिरीक्षकाला पोलिस कोठडी

CD

पुणे, ता. ३ : दोन कोटी रुपये लाचेची मागणी करून, ४६ लाख रुपयांची लाच घेणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकाला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली. या अधिकाऱ्याच्या घरझडतीत ५१ लाखांची रोकड, सोन्याचे दागिने आणि मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली. ही रोकड मोजण्यासाठी ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांना मशिनचा वापर करावा लागला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने पोलिस उपनिरीक्षक प्रमोद रवींद्र चिंतामणी (वय ३५) याला रविवारी रास्ता पेठ परिसरात ४६ लाख ५० हजार रुपयांची लाच घेताना पकडले. चिंतामणी हा पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
आरोपी चिंतामणी याला सोमवारी शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पाच नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, ‘एसीबी’च्या पथकाने त्याच्या भोसरीतील सोपान रेसिडेन्सीमधील घर आणि कार्यालयाची झडती घेतली. त्यावेळी ५१ लाख रुपयांची रोकड, सोन्याचे दागिने आणि मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली. ‘रोकड एवढ्या प्रमाणात होती की ती मोजण्यासाठी मशिनचा वापर करावा लागला,’ अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे यांनी दिली.
‘एसीबी’ सूत्रांच्या माहितीनुसार, तक्रारदार वकिलाच्या अशिलाविरुद्ध पाच कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा बावधन पोलिस ठाण्यात दाखल आहे. या प्रकरणाचा तपास चिंतामणीकडे होता. संबंधित अशिलाचे वडील आधीच अटकेत असून, ते न्यायालयीन कोठडीत आहेत. अशिलाला मदत करण्यासाठी आणि त्याच्या वडिलांच्या जामीन अर्जावर सकारात्मक भूमिका घेण्याच्या बदल्यात चिंतामणी याने दोन कोटी रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदार वकिलाने ही बाब थेट ‘एसीबी’कडे नेली. त्यानंतर पथकाने सापळा रचून ४६ लाख ५० हजार रुपये घेताना चिंतामणीला पकडले. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत तपास करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde: पोलिसांविरोधात आमदार शशिकांत शिंदे आक्रमक; कोरेगावात मोर्चा; बैठकीबाबतचे पत्र दोन दिवसांत द्यावे, नेमंक काय प्रकरण..

Devendra Fadnavis : कुंभमेळ्याच्या तयारीला वेग! ७ नोव्हेंबरला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ७ हजार कोटींच्या कामांचे भूमिपूजन

Latest Marathi News Live Update : मतदार यादीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी सुरु

Video: 'फक्त ७ तास...' टीम इंडियाच्या खऱ्या कबीर खानचा फायनलआधी स्पेशल मेसेज अन् विश्वविजयानंतर रोहितप्रमाणे मैदानात रोवला तिरंगा

Cancer Love Horoscope: कर्क राशीच्या प्रेम जीवनात आज काय खास घडणार? वाचा तुमचं राशिभविष्य

SCROLL FOR NEXT