पुणे

शीतल तेजवानी उपस्थित राहणार का? दस्त रद्द करण्यासाठी खरेदीदार व विक्री करणाऱ्यांना हजर राहावे लागणार

CD

पुणे, ता. ९ : मुंढवा येथील शासकीय जमीन खरेदीचा झालेला व्यवहार रद्द करण्याची तयारी अमेडिया एंटरप्रायझेस कंपनीने दाखविली असली, तरी या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने अडचणी वाढल्या आहेत. या व्यवहाराचा दस्त रद्द (कॅन्सल डिड) करण्यासाठी खरेदीदार आणि विक्री करणारे अशा दोघांना समक्ष हजर राहावे लागणार आहे. त्यासाठी या प्रकरणातील शीतल तेजवानी समक्ष हजर राहणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
मुंढवा येथील शासनाच्या मालकीची ४० एकर जमीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार भागीदार असलेल्या अमेडिया एंटरप्रायझेसने तीनशे कोटी रुपयांमध्ये खरेदी केली आहे. हा व्यवहार ‘अमेडिया’चे भागीदार दिग्विजयसिंह पाटील व कुलमुखत्यारधारक शीतल तेजवानी यांच्यामध्ये झाला आहे. या खरेदीखतावेळी (दस्त नोंदणी) कंपनीने या जागेवर डेटा सेंटर उभारण्यात येणार असल्याचे सांगून जिल्हा उद्योग केंद्राकडून मुद्रांक शुल्कात माफी घेतली तर दुय्यम निबंधकांनीदेखील दस्तांवरील पाच टक्के मुद्रांक शुल्क माफ करण्याऐवजी सात टक्के शुल्क माफी दिली आहे. शासनाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता हा व्यवहार करण्यात आला. त्यामुळे या प्रकरणी शासकीय जमिनींचा अपहार झाल्यामुळे शीतल तेजवानी आणि अमेडिया एंटरप्रायझेसचे दिग्विजय पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर हे खरेदीखत रद्द करण्याचा निर्णय कंपनीच्यावतीने घेण्यात आला आहे. त्यासाठी कंपनीच्या लोकांनी दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन चौकशीही केली होती. परंतु हा दस्त रद्द करण्यासाठी कॅन्सल डिड करावे लागणार आहे. त्यासाठी ज्या दोघांमध्ये हा व्यवहार झाला आहे. त्या दोघांनाही हजर राहून तो रद्द करावा लागणार आहे. तसेच त्यापोटी ४२ कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहेत. परंतु या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यामुळे कॅन्सल डिड करण्यासाठी तेजवानी यांना प्रत्यक्ष हजर राहावे लागणार आहे. व्यवहार रद्द करण्यासाठी त्या हजर राहणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
-------

‘‘मुंढवा येथील जमीन व्यवहार प्रकरणाशी संबंधित महसूल आणि नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग यांच्याकडून सर्व कागदपत्रे मागविण्यात आली आहेत. ती प्राप्त झाल्यानंतर कागदपत्रे आणि व्यवहाराची पडताळणी करण्यात येणार आहे.
- विवेक मासाळ, पोलिस उपायुक्त, आर्थिक गुन्हे शाखा.
-----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT