पुणे

जैन बोर्डिंगचा वादग्रस्त व्यवहार रद्द करण्यावर शिक्कामोर्तब

CD

पुणे, ता. १४ : मॉडेल कॉलनीतील शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंगच्या तीन एकर जागेच्या विक्रीचा वादग्रस्त व्यवहार रद्द करण्याचा आदेश दिवाणी न्यायालयाने शुक्रवारी (ता. १४) दिला. यामुळे ट्रस्ट आणि विकसक गोखले लँडमार्क्स एलएलपी यांच्यातील जमीन खरेदी दस्त कायदेशीरदृष्ट्या रद्दबातल झाला आहे.

या जागेच्या विक्री व्यवहाराला धर्मादाय आयुक्तांनी ४ एप्रिल रोजी मंजुरी दिली होती. त्यानंतर जैन समाजाकडून तीव्र विरोध सुरू झाला होता. आचार्य गुप्तीनंद महाराजांच्या नेतृत्वाखाली ‘जैन बोर्डिंग बचाव कृती समिती’ने मोठे आंदोलन छेडले. या दबावामुळे गोखले लँडमार्क्स कंपनीने स्वेच्छेने या व्यवहारातून माघार घेतली. यानंतर ट्रस्ट आणि विकसकांनी संयुक्त प्रतिज्ञापत्र दाखल करून व्यवहार रद्द करण्यास हरकत नसल्याचे धर्मादाय आयुक्तांना कळवले. त्यानुसार आयुक्तांनी विक्री व्यवहाराला दिलेली मंजुरी रद्द केली, तसेच खरेदी खत रद्द करण्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

ट्रस्ट आणि विकसकांनी दिवाणी न्यायालयात खरेदी खत रद्द करण्याची याचिका दाखल केली होती. दिवाणी न्यायाधीश एन. आर. गजभिये यांनी हा विक्री दस्त रद्द करण्याचा आदेश दिल्याची माहिती अॅड. योगेश पांडे यांनी दिली. या सुनावणीदरम्यान ट्रस्टतर्फे अॅड. इशान कोल्हटकर, विकसक कंपनीतर्फे अॅड. निश्चल आनंद, तसेच जैन बोर्डिंग बचाव कृती समितीच्या वतीने अॅड. अनिल पटणी, अॅड. सुकौशल जिंतूरकर, अॅड. योगेश पांडे आणि अॅड. आशिष पटणी यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ram Sutar Maharashtra Bhushan: ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' प्रदान

Katraj Accident : कात्रज चौकात चिकन वाहतूक करणाऱ्या टेम्पोला आग; वाहतुकीस अडथळा!

Pune ATS: जुबेरच्या लॅपटॉपमध्ये आक्षेपार्ह फाईल्स; अल-कायदासाठी काम, न्यायालयीन कोठडीत झाली रवानगी

PM Modi big Statement on Congress : बिहारमधील मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेसचा मोठा गट फुटणार? ; मोदींच्या ‘त्या’ विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ!

Navale Bridge Accident : नवले पुलावरील अपघात प्रकरणी कंटेनर मालकासह तिघांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT