पुणे

सुनेला पेटवून देणाऱ्या सासू-नणंदला जन्मठेप

CD

पुणे, ता. १८ ः स्वयंपाक करण्यावरून झालेल्या भांडणातून सुनेला रॉकेल टाकून पेटवून देत जिवे मारणाऱ्या सासू व नणंदला न्यायालयाने जन्मठेप आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. मृत्युपूर्वी सुनेने दिलेला जबाब आणि वैद्यकीय पुराव्यांवरून दोन्ही आरोपींनी तिचा खून केल्याचे सरकार पक्षाने सिद्ध केले. त्या आधारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रभाकर जाधव यांनी हा निकाल दिला.
ममता विजय चव्हाण (वय ४८, रा. मंगळवार पेठ, श्रमिकनगर) आणि रिटा ऊर्फ गौरी संतोष वाल्मिके (वय ३४, रा. जयजवाननगर) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांनी दीपाली अमित चव्हाण (वय २८) हिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. ही घटना १ नोव्हेंबर २०१३ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास श्रमिकनगर येथे घडली. गंभीररीत्या भाजलेल्या दीपालीला पती अमितने ससून रुग्णालयात नेले. उपचारांदरम्यान दीपालीचा ४ नोव्हेंबर २०१३ मृत्यू झाला होता. या प्रकरणी
गाडीतळ पोलिस चौकीचे तत्कालीन सहायक निरीक्षक परशुराम शिंदे यांनी डॉक्टरांच्या उपस्थितीत तिचा जबाब नोंदविला. त्यानंतर पोलिसांनी सासू व नणंदला अटक केली. त्यामुळे आरोपींविरोधात खुनाचे कलम जोडत तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी बाजू मांडली. त्यांनी आठ साक्षीदार तपासले, तर बचाव पक्षातर्फे दोन साक्षीदार तपासण्यात आले. सून कायम भांडत असे, तसेच तिने यापूर्वी एक-दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. घटनेच्या दिवशीही तिने भांडण केले. मात्र, आपण घरी नव्हतो, असा बचाव आरोपींनी केला. मात्र, पीडितेने सजगपणे मृत्युपूर्व जबाब दिला असून जबाब नोंदविणारे सहायक निरीक्षक आणि उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी त्याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे मृत्युपूर्व जबाब आणि तक्रार ही संशयापलिकडे सिद्ध होते असा निष्कर्ष काढून न्यायालयाने हा निकाल दिला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

SCROLL FOR NEXT