पुणे

महापालिका, ग्रामीणमध्ये २२ जलस्रोत दूषित

CD

पुणे, ता. १८ ः ‘गुलियन बॅरी सिंड्रोम’च्या (जीबीएस) पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद प्रशासनाकडून पाण्याच्या नमुन्यांची तपासणी सुरू केली आहे. यामध्ये पहिल्या तपासणीत २२ जलस्रोतांचे नमुने हे दूषित आढळून आले, त्यापैकी केवळ सहा जलस्रोत हे ग्रामीण भागातील असून, उर्वरित स्रोत हे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली.

आत्तापर्यंत जिल्ह्यातील १४१ जलस्रोतांमधील नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली. या तपासणीत पहिल्या २२ स्रोतांचे पाणी दूषित आढळले होते. पाणी व स्वच्छता आणि आरोग्य विभागाच्या समन्वयाने ही मोहीम सुरू आहे. त्यामध्ये आरोग्यसेवक हे नमुने गोळा करण्याचे काम करत असून, पाणी व स्वच्छता विभागाकडून प्रयोगशाळेतून नमुन्यांची तपासणी करून घेतली जात आहे. बावीसपैकी सोळा स्रोत हे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील आहेत, त्याबाबत दैनंदिन अहवाल घेण्यात येत आहे. त्याबाबत जिल्हा परिषदेकडून दैनंदिन आढावा बैठकीत मंत्रालयालाही माहिती देण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ‘जीबीएस’चा प्रादुर्भाव असलेल्या समाविष्ट गावांसह पूर्ण जिल्ह्यातीलच पाण्याच्या नमुन्यांची या मोहिमेत तपासणी केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

SCROLL FOR NEXT