पुणे

कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता

CD

पुणे, ता. १८ ः पुण्यात सध्या उन्हाचा कडाका वाढला असून, कोरेगाव पार्क परिसरात सर्वात जास्त ३७.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. पुढील दोन दिवस शहरातील हवामान कोरडे राहील, त्यामुळे कमाल तापमानात काहीअंशी वाढ होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

पुण्यात मंगळवारी (ता. १८) कमाल तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली. शहरातील हवेली परिसरात सर्वात कमी १३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. दिवसभर उन्हाचा चटका जाणवत असून, कोरेगाव पार्क, राजगुरुनगर, मगरपट्टा, एनडीए, चिंचवड, शिवाजीनगर, पाषाण आणि इंदापूर परिसरातील कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे असल्याने उकाडा जाणवत होता. दरम्यान, हवामानातील सततच्या बदलामुळे पहाटे गारवा आणि दिवसभर उन्हाचा चटका असा अनुभव पुणेकरांना येत आहे. मागील चोवीस तासांत कमाल व किमान तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.
----------
विदर्भामध्ये हलका पाऊस
राज्यातील विदर्भामध्ये शुक्रवार (ता. २१) आणि शनिवारी (ता. २२) पावसाच्या हलक्या सरी पडतील, तर अन्य राज्यातील हवामान कोरडे राहील असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. राज्यातील कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात कमाल तापमानात वाढ होत आहे. अकोला येथे सर्वाधिक ३७.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: राज्यसभा उपसभापतीपदाची निवडणूक १७ एप्रिल २०२६ रोजी घेतली जाईल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT