पुणे, ता. १९ : ज्योत्स्ना सुरेश डोळ शिशुमंदिर हुजूरपागा शाळेतर्फे पालकशाळेचे आयोजन करण्यात आले होते. राजेंद्र बहाळकर यांनी पालकांना ‘यशस्वी आई-बाबा’ या विषयावर मार्गदर्शन केले. खेळ घेऊन, गाणी म्हणून आनंदी वातावरणात मुलांना कसे घडवायचे, वागणुकीत सकारात्मकता कशी आणायची आणि यशस्वी आई-बाबा कसे व्हायचे, हे त्यांनी सांगितले, तसेच प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून पालकांच्या शंकांचे निरसन केले. मुख्याध्यापिका अनघा रानडे यांनी पालकशाळेचे नियोजन केले. सहशिक्षिका कांचन जगताप यांनी सूत्रसंचालन केले. मुग्धा आपटे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.