पुणे, ता. ४ ः महर्षिनगर-सॅलिसबरी पार्क परिसरात नवीन सांस्कृतिक भवन उभारण्याची मागणी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उपाध्यक्ष बाळासाहेब अटल यांनी नगरविकास, महिला व बालकल्याण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
प्रभागातील विविध ज्येष्ठ नागरिक संघ आणि रहिवाशांना सांस्कृतिक, सामाजिक व अन्य घरगुती कार्यक्रम साजरे करता यावेत, तसेच कार्यक्रमासाठी खासगी सभागृहांचे भाडे परवडत नसल्याने सर्वसामान्यांच्या हितासाठी प्रभागातच उत्तम दर्जाचे सांस्कृतिक भवन लवकरात लवकर उभारण्यात यावे, अशी मागणी अटल यांनी केली. यासाठी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.