पुणे

‘गुन्हेगारांच्या आश्रयाला आळा घाला’

CD

पुणे, ता. ७ ः ‘‘शहराचा व्याप खूप वाढत आहे. अनेक ठिकाणांहून आलेले नागरिक, वाढत चाललेले शहर तसेच वाढत चाललेली गुन्हेगारीवृत्ती यामुळे आरोपी येथे आश्रय घेत आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारीला खतपाणी घालणारा वर्गही वाढत आहे,’’ अशा प्रतिक्रिया ‘सकाळ’च्या वाचकांनी व्यक्त केल्या. बड्या व्यक्तींकडून मिळणारा आश्रय, ओळख न पटण्याची शक्यता, पुण्याचा इतर शहरांशी असलेला कनेक्ट, लपण्यासाठी आवश्यक व्यवस्था आणि उपलब्ध असलेली संपर्क यंत्रणा यामुळे राज्यातील विविध ठिकाणांसह देशभरातून विविध गुन्ह्यांतील आरोपी पुण्यात लपत आहेत. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले असून, नागरिकांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

सध्या शहरात राज्याच्या विविध भागांतून नागरिक वास्तव्यास येत आहेत. वाढत चाललेली गुन्हेगारीवृत्ती यामुळे अशा प्रकारच्या लोकांना येथे आश्रय मिळणे सोपे होते. या सगळ्यावर जरब बसण्यासाठी पोलिसांनाच एखादे उदाहरण कायम करावे लागेल. शहरात आश्रयास आले की आपले काय हाल होतात, याचे उदाहरण पोलिसांना दाखवावे लागेल, मग त्याला आळा बसेल.
- धनंजय गुणे, तळेगाव

पुणे, पिंपरी-चिंचवड जसे वाढत आहे, तसा गुन्हेगारीला खतपाणी घालणारा वर्गही वाढत आहे. त्यामुळेच गुन्हे करून पुण्यात लपणे सोपे झाले आहे. कमी वयात जास्त पैसा, मौजमजा करण्यासाठी तरुणपिढी ही वाट पकडत आहे. या पिढीचा राजकीय लोक योग्य वापर करून घेतात. अशा लोकांना पाठीशी घालतात आणि त्यांना वाचवण्यासाठी मदतही करतात. राजकारणी लोकांसोबत कुठे तरी संबंध या गुन्हेगारी वर्गाचा असतो आणि त्यामुळे यांना ना पोलिसांची भीती ना न्यायव्यवस्थेची. याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कडक धोरणे अवलंबली पाहिजेत.
- अवधूत बाटे, पिंपरी चिंचवड

विद्येच्या माहेरघरात पुण्यात एकेकाळी लेखक, साहित्यिक, नाटककार विचारवंत, असायचे. आता पुण्यात गुन्हेगार असतात.
- परेश खांडके

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी : ऋतुराज गायकवाडची भारतीय संघात एन्ट्री; उप कर्णधाराची जबाबदारी, वैभव सूर्यवंशीही संघात...

CNG Shortage: पालघरमध्ये सीएनजीचा तीव्र तुटवडा! ३ किमी लांब वाहनांच्या रांगा, इंधनासाठी ५ तास चालक प्रतिक्षेत

Repo Rate News: होम लोन आणि FD गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! RBI व्याजदर बदलणार का? मोठा निर्णय लवकरच

"कास्टिंग काऊचमुळे लेकीने इंडस्ट्री सोडली" अभिनेत्रीने व्यक्त केली खंत "आता जगावंसं वाटत नाही"

Maharashtra Weather: अल निनोमुळे मान्सूनचा प्रवास थांबला, आगमन लांबणीवर? शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

SCROLL FOR NEXT