पुणे

नियम न पाळणाऱ्या सात रुग्णालयांना नोटिसा

CD

पुणे, ता. ११ : रुग्णालयाच्या दर्शनी भागात रुग्ण हक्क संहिता, रुग्णालयाचे दर पत्रक, तक्रारीसाठी महापालिकेचा टोल फ्री क्रमांक, नमुना ड (रुग्णाचा तपशील), अग्निशमन दलाचे प्रमाणपत्र लावणे आदी महाराष्ट्र सुश्रृषा गृह नोंदणी कायद्यानुसार बंधनकारक आहे. यासह इतर नियमांचे पालन न केल्‍याप्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागाने सोमवारी सात खासगी रुग्णालयांना वेगवेगळ्या त्रुटींबाबत कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. यामध्ये कसबा पेठ, घोले रस्ता, कोथरूड येथील प्रत्‍येकी एक तर औंध क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील चार आणि अशा सात रुग्णालयांचा समावेश आहे.
गेल्‍या आठवड्यात चार रुग्णालयांना नोटिसा पाठवण्यात आल्‍या होत्‍या. त्‍यानंतर आता पुन्‍हा सात रुग्‍णालयांना नोटिसा पाठवल्‍या आहेत. त्‍यांच्‍याकडून याबाबत खुलासा मागवण्‍यात येतो व त्रुटींची पूर्तता करण्‍यासाठी वेळ दिला जातो. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दर वर्षी सहा महिन्यांच्या टप्प्याने दोनदा खासगी रुग्णालयांची तपासणी केली जाते. यामध्ये दरपत्रक, रुग्णहक्क संहिता, टोल फ्री क्रमांक अशा विविध निकषांवर तपासणी केली जाते. तसेच, रुग्‍णांच्‍या तक्रारीवरूनही नोटीस पाठवण्‍यात येते. सोमवारी नोटीस देण्यात आलेल्या रुग्णालयांमध्ये दरपत्रक आणि रुग्ण हक्क संहिता दर्शनी भागात न लावणे, टोल फ्री क्रमांक न लिहिणे, अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र नसणे अशा त्रुटी आढळून आल्या आहेत, अशी माहिती सहाय्यक आरोग्‍य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली.
सध्‍या महाराष्ट्र सुश्रृषा गृह नोंदणी या कायद्यानुसार रुग्णालयांकडून नियमांचे पालन केले जाते की नाही याची तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत रुग्णालयांना त्रुटी दूर करण्यासंदर्भात नोटीस बजाविण्यात आली आहे. त्यासाठी त्यांना तीस दिवसांची मुदत दिली आहे.

शहरात लहान-मोठी अशी सुमारे साडेआठशे रुग्णालये व नर्सिंग होम आहेत. महापालिकेकडून वर्षातून दोन वेळा खासगी रुग्णालयांची विविध निकषांतर्गत तपासणी केली जाते. नोटीस दिल्यानंतरही त्रुटींची पूर्तता न करणाऱ्या रुग्णालयाच्या प्रशासनावर कारवाई केली जाते. त्‍यांना त्‍यासाठी तीन दिवसांची मुदत दिली आहे .
- डॉ. सूर्यकांत देवकर, सहाय्यक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका
............
-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळणार! कधी अन् कुठे, IMDने तारीखच सांगितली

Zomato delivery boy accident: झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय मुसळधार पावसात पडला उघड्या गटारात अन् मग...

मुंबई-वडोदरा एक्सप्रेसवेचे काम अंतिम टप्प्यात, प्रवासात पाच तासांची बचत; कधीपासून होणार वाहतूक सुरु?

Mhada House: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! म्हाडाचे घर होणार आणखी स्वस्त, किती टक्क्यांनी घटणार; वाचा अहवाल

PM Modi and Zelenskyy : मोठी बातमी! आता मोदी अन् झेलेन्स्कींचीही झाली चर्चा; जाणून घ्या, कोण काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT