पुणे

उपभोगवादामुळे मूलभूत समस्या दुर्लक्षित

CD

पुणे, ता. १३ ः ‘‘आजच्या काळात भारतात आर्थिक विषमता वाढत असून लोककल्याणावरून लक्ष हटविले जात आहे. त्यामुळे समताधिष्ठित विकासाच्या दिशेने नवे विचार आणि चळवळ आवश्यक आहे. उपभोगवादामुळे मूलभूत समस्या दुर्लक्षित केल्या जात आहेत’’, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. अरुणकुमार यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री आणि समाजवादी नेते प्रा. सदानंद वर्दे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशनतर्फे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. ‘पूँजीवाद के चरण और भारत में आज़ादी के बाद बढती चुनौतियाँ’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. याप्रसंगी ज्येष्ठ समाजवादी नेते गजानन खातू, झेलम परांजपे, विनोद शिरसाठ, प्रा. सुभाष वारे आदी उपस्थित होते.
प्रा. अरुणकुमार म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यपूर्व काळातील शोषणाची अर्थव्यवस्था, स्वातंत्र्योत्तर काळातील सार्वजनिक क्षेत्राला प्राधान्य देणारी अर्थव्यवस्था आणि नंतर उदारीकरणाची अर्थव्यवस्था या टप्प्यातून आपण गेलो आहोत; पण आज नफेखोरी, लालसा, विषमता आणि बाजारकेंद्री दृष्टिकोन वाढत असून मूलभूत विषय बाजूला पडत आहेत. भारत चौथी मोठी अर्थव्यवस्था नसून आपण सातव्या क्रमांकावर आहोत. मोफत वस्तू किंवा पैसे देण्याने प्रगती होईल की रोजगार निर्मितीमध्ये गुंतवणूक केल्याने प्रगती होईल, हे सध्याचे सरकार लक्षात घेत नाही.’’ उपेंद्र टण्णू यांनी सूत्रसंचालन केले. राहुल भोसले यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC SSC Exam : बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीपासून; तर दहावीची २० फेब्रुवारीपासून होणार सुरू

PF withdrawal latest Update : दिवाळीआधी केंद्र सरकारकडून नोकरदारवर्गास ‘GOOD NEWS’ ; 'PF'ची १०० टक्के रक्कम काढता येणार!

Sangli News : ‘पावती करायची नाय...’ ही एक ‘रील’ पडली महागात

Pune News : बेपत्ता दोन मुली सुखरूप सापडल्या; पाचशे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले

ST Workers Diwali: एसटी कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपये दिवाळी भेट; अग्रीम म्हणून 'इतकी' रक्कम मिळणार

SCROLL FOR NEXT