पुणे

तीन अपघातांमध्ये मोटारचालकासह तिघांचा मृत्यू

CD

पुणे, ता. १३ : शहरातील पुणे-सातारा रस्ता, कोंढवा आणि फुरसुंगी परिसरात एकाच दिवशी तीन अपघातांमध्ये मोटारचालकासह दोन पादचाऱ्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पर्वती, कोंढवा आणि फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रजहून स्वारगेटकडे निघालेल्या भरधाव पीएमपी बसची पुणे-सातारा रस्त्यावर तावरे कॉलनीजवळ बीआरटी मार्ग ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला धडक बसली. या अपघातात विकी बसवराज कोलते (वय ३०, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, सातारा रस्ता) या तरुणाचा मृत्यू झाला. शनिवारी (ता. ११) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. याबाबत पोलिस अंमलदार ज्ञानेश्वर शिंदे यांनी पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पीएमपी बसचालक सुदर्शन निवृत्ती तांदळे (वय २५, रा. आंबेगाव बुद्रुक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरधाव रिक्षाची मोटारीला धडक बसल्याने मोटारचालकाचा मृत्यू झाला. ही घटना कोंढव्यातील ‘एनआयबीएम’ रस्त्यावर शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. प्रसाद प्रल्हाद कुलकर्णी (वय २६, रा. महेश सोसायटी, बिबवेवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या मोटारचालकाचे नाव आहे. विरुद्ध दिशेने वेगाने आलेल्या रिक्षाने दिलेल्या धडकेत त्यांचे मोटारीवरील नियंत्रण सुटले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मित्र सम्मेद पाटील यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार कोंढवा पोलिसांनी रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अन्य एका अपघातात भरधाव वाहनाची धडक बसल्याने पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना हडपसर-सासवड रस्त्यावर फुरसुंगी भागात शुक्रवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास घडली. गणेश रमेश बोराळे (वय २५, रा. भेकराईनगर, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. अपघातानंतर वाहनचालक पसार झाला असून, पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार निखिल पवार यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT