पुणे

माणिकबाग ते हिंगणे काम रखडले

CD

पुणे, ता. २३ ः सिंहगड रस्त्यावरील तिसऱ्या टप्प्यातील उड्डाण पूल १५ जून रोजी वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे महापालिका प्रशासनाने जाहीर केले होते; पण मे व जून महिन्यात झालेल्या जोरदार पावसानंतर या कामाचे नियोजन बिघडले आहे. त्यामुळे माणिकबाग ते हिंगणे या दरम्यानचा उड्डाण पूल सुरू होण्यास अजून किमान एक महिना लागण्याची शक्यता आहे.
सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ११८ कोटी रुपये खर्च करून उड्डाण पूल बांधण्याचे काम सप्टेंबर २०२२ मध्ये झाले. यामध्ये राजाराम पूल चौक, विठ्ठलवाडी कमान ते फनटाइम थिएटर या दोन टप्प्यातील उड्डाण पुलांचे काम पूर्ण झाले. या दोन्ही पुलांचे लोकार्पण अनुक्रमे २६ जानेवारी २०२५ आणि १ मे २०२५ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील माणिकबाग ते हिंगणे या दरम्यानच्या सुमारे दीड किलोमीटर लांबीच्या उड्डाण पुलाचे उद्‍घाटन १५ जून रोजी होणार असल्याचे महापालिका प्रशासनाने जाहीर केले होते. त्याचे कामही वेगात सुरू होते. पण मे महिन्यापासून सतत मोठा पाऊस पडत आहे. त्यामुळे उड्डाण पुलाचे रॅम्प तयार करण्याचे काम काही दिवस थांबले होते. या रॅम्पवरील मुरमाचे चिखलात रूपांतर झाले, त्यामुळे पुढचे काम करण्यासाठी मुरूम सुकण्याची वाट पाहावी लागली. तसेच उड्डाण पुलावरील डांबरीकरण पावसामुळे करता आलेले नाही. जून महिन्यातही चांगला पाऊस झाला. त्यामुळे कामाची गती संथ झाली आहे. हे काम जुलै महिन्याच्या अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे. प्रकल्प विभागाचे प्रमुख, मुख्य अभियंता युवराज देशमुख म्हणाले, माणिकबाग ते हिंगणे उड्डाण पुलाचा रॅम्प तयार करताना मुरूम टाकल्यानंतर पावसामुळे तेथे चिखल झाला. त्यानंतर डांबरीकरण आणि अन्य कामे करण्यात अडथळे निर्माण झाले. हे काम पूर्ण होण्यास आणखी काही दिवसांचा कालावधी लागणार आहे.

बॉटेलनेकचे काय करणार?
हिंगण्यामध्ये ज्या ठिकाणी उड्डाण पूल उतरतो तेथे सेवा रस्ता अरुंद आहे. त्याठिकाणी रस्त्याच्या कडेला झाड आहे. तसेच पेट्रोल पंपावरील सीएनजी भरणाऱ्या वाहनांची रांग रस्त्यावर आल्याने या ठिकाणी कोंडी होत आहे. अनेकदा पेट्रोलपंपापासून मागे संतोष हॉलपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. उड्डाणपूल सुरू झाल्यानंतरही ही कोंडी कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच उड्डाण पुलावरून येणारी वाहने डावीकडे वळून पेट्रोल पंपावर जाण्याचा प्रयत्न केल्यास अपघात होण्याची शक्यता आहे तसेच कोंडीही वाढणार आहे. त्यामुळे या ठिकाणचा बॉटलनेक महापालिका प्रशासन, वाहतूक पोलिस कसा संपविणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satyapal Malik: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन, दिल्लीतील राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

Latest Maharashtra News Updates Live : नांदणी मठानं याचिका दाखल करावी- मुख्यमंत्री फडणवीस

संतापजनक! पतीकडून सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीची चाकूने भोसकून हत्या, सपना जोरजोरात ओरडत होती पण..; खोलीभर पसरलं होतं रक्त

Godavari River: अंबड तालुक्यातील तरुण युवकाचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू, शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

Karad News: 'रस्त्यांचे हक्क उठविण्यासाठी सर्व्हे'; घरकुलांसाठी मिळणार जागा; बेघरांना लाभ, अतिक्रमणेही होणार नियमित

SCROLL FOR NEXT