पुणे

‘पुरुषोत्तम’ची महाअंतिम फेरी २६ डिसेंबरपासून

CD

पुणे, ता. ३ : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची महाअंतिम फेरी २६ ते २८ डिसेंबर या कालावधीत भरत नाट्य मंदिर येथे होणार आहे. पुण्यासह रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि कोल्हापूर केंद्रांवर झालेल्या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय आणि सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकांची महाअंतिम फेरी पुण्यात रंगणार आहे. पुणे आणि रत्नागिरी केंद्रांवर सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेचे यंदा कुठल्याही संघाला पारितोषिक मिळाले नसल्याने १८ संघांचे महाअंतिम फेरीत सादरीकरण होणार आहे.
महाअंतिम फेरी स्पर्धेचे लॉटस्‌ २५ डिसेंबरला काढण्यात येतील. त्यानंतर २६ आणि २७ डिसेंबरला सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन सत्रांत, तर २८ डिसेंबरला सकाळच्या सत्रात स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचे पारितोषिक वितरण २८ डिसेंबरला सायंकाळी करण्यात येईल.

महाअंतिम फेरीत पोहोचलेले संघ (महाविद्यालयाचे नाव आणि एकांकिका या क्रमाने)
केंद्राचे नाव : महाविद्यालयाचे नाव (एकांकिका)
पुणे केंद्र : अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर (काही प्रॉब्लेम ये का), मॉडर्न कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, गणेशखिंड (वामन आख्यान), सर परशुरामभाऊ महाविद्यालय- स्वायत्त (आतल्या गाठी),
अमरावती केंद्र : प्रा. राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड रिसर्च, बडनेरा (अर्बन), श्री ब्रजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालय, अमरावती (स्वधर्म), विद्याभारती महाविद्यालय, अमरावती (लगीन), वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था, नागपूर (गोष्टीचा खेळ).
छत्रपती संभाजीनगर केंद्र : सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय नाट्यशास्त्र विभाग, छत्रपती संभाजीनगर (वयाचं गणित), मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे देवगिरी महाविद्यालय नाट्यशास्त्र विभाग (खोडाला फांदीचा आधार), शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर (जिव्हाळा), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, नाट्यशास्त्र विभाग छत्रपती संभाजीनगर (बुजगावणं).
रत्नागिरी केंद्र : मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी (जाळ्यातील खिळे), फिनोलेक्स ॲकॅडमी ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजी (ठोंग्या), फिनोलेक्स ॲकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड टेक्नॉलॉजी (तुकारामाची टोपी).
कोल्हापूर केंद्र : दे. भा. रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर (ग्वाही), आर्ट्‌स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज, नागठाणे (सोयरिक), तंत्रज्ञान अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (अ यूसलेस जिनिअस), संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (अस्तित्व).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Marathi Vishwa Sammelan : विश्वसंमेलनाचे 'आदर्श मॉडेल' ठरणार की नाही? नाशिकमध्ये २६ डिसेंबरपासून संमेलन, अद्याप पाहुणे निश्चित नाहीत, ना आमंत्रण पत्रिका

Chh. Sambhajinagar: आणि आश्चर्य! उधळलेल्या बैलांनीच बिबट्याला पळवून लावले; खुलताबादात थरार

हळद लागली ! थाटात पार पडला तेजस्विनी लोणारीचा हळदी समारंभ; मैत्रिणींचा डान्स आणि बरंच काही

Maharashtra Environment : पर्यावरणाच्या समस्यांवर मात करण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; जिल्हा पर्यावरण समितीची पुनर्रचना, समिती आता अधिक व्यापक

Latest Marathi News Live Update : विद्यार्थ्यांना जादू टोण्यासारखा प्रकार करून तलब जिहादमध्ये अडकवण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT