पुणे

विशेष न्यायालयाने राहुल गांधी यांना फटकारले समन्सच्या आदेशाबाबत टिप्पणी करणे अयोग्य असल्याचे मत

CD

पुणे, ता. ३ ः स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्या प्रकरणात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या समन्स जारी करण्याच्या निर्णयावर आणि कामकाजावर शंका उपस्थित करणारी विधाने केल्याप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पुण्याच्या विशेष न्यायालयाने फटकारले आहे.
राहुल गांधी यांनी मार्च २०२३ मध्ये लंडनमधील अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीची याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात सरतपासणीदरम्यान पुरावा म्हणून न्यायालयात सादर केलेली सीडी रिकामी असल्याने पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे तक्रारदारांच्या वकिलांनी आरोपीच्या सरतपासणीसाठी पुढील तारीख मागितली. त्यावर राहुल गांधी यांचे वकील अॅड. मिलिंद पवार यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३०९ अंतर्गत अर्ज करून तीव्र आक्षेप नोंदविला. तक्रारदारांना सरतपासणी व पुरावा नोंदविण्यासाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात येऊ नये, तातडीने पुरावा पूर्ण करण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. या अर्जातील ‘तक्रारदारांनी न्यायालयावर अनावश्यक दबाव टाकून व तातडीचे वातावरण निर्माण करून राहुल गांधी यांच्या विरोधात समन्स जारी करण्याचा आदेश मिळविला आहे,’ तसेच तक्रारदाराने कायदेशीर पुराव्याऐवजी मर्यादा ओलांडून समन्स मिळविले,’ या वाक्यांवर सात्यकी सावरकरांच्या वकिलांनी आक्षेप घेतला. राहुल गांधी यांच्या अर्जातील या विधानांमुळे न्यायालयाच्या निष्पक्ष कामकाजावर शंका निर्माण होत असल्याची तक्रार त्यांनी न्यायालयाकडे केली. त्यावर राहुल गांधी यांच्या वकिलांनी ‘तक्रारदारांकडून खटला जाणूनबुजून लांबविण्यात येत असून, पुरावे सादर करण्यात अपयशी ठरत आहेत,’ असे स्पष्टीकरण दिले. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर राहुल गांधी यांच्या अर्जात न्यायालयाच्या कामकाजावर शंका उपस्थित करण्यात आल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले.
‘न्यायालयाने काढलेल्या समन्सच्या आदेशाबाबत आरोपीला आक्षेप असल्यास त्यावर योग्य न्यायालयात आव्हान देता येईल. मात्र, त्यावर टिप्पणी करणे योग्य नाही. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशांवर कोणतीही टिप्पणी करू नये, असे स्पष्ट निर्देश विशेष न्यायाधीश अमोल शिंदे यांनी राहुल गांधी यांना दिले आहेत. लोकप्रतिनिधींवर दाखल दाव्यांची सुनावणी घेणाऱ्या पुण्यातील विशेष न्यायालयात या याचिकेची सुनावणी सुरू आहे. त्यामध्ये तक्रारदारांच्या वतीने अॅड. संग्राम कोल्हटकर यांच्याकडून राहुल गांधी यांची सरतपासणी घेऊन पुरावा नोंदविण्यात येत आहे.
.............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NDA Rajya Sabha Majority : राज्यसभेत एनडीएची दमदार एंट्री; बहुमताचा आकडा पार, विधेयक मंजुरीसाठी येणार नाही अडचण

Nagpur News: विद्युत पोलवरून पडून कंत्राटी कामगाराचा मृत्यू; देवलापारच्या वाघोली परिसरातील घटना, गावात शोककळा

Latest Marathi News Live Update : दिल्लीत एका व्यक्तीने पिस्तूल लोड करताना असताना स्वतःवरच गोळी झाडली

Kuno Cheetah: भारतात चित्त्यांचे 'अर्धशतक' पूर्ण! ज्वालाने दिला ५ पिल्लांना जन्म; कूनोमध्ये आता चित्त्यांची संख्या ५३ वर!

Maharashtra U23 Women Cricket: महिला २३ वर्षाखालील क्रिकेट; महाराष्ट्राने तमिळनाडूवर ८ विकेटने मात

SCROLL FOR NEXT