पुणे

एसटी चालकांना सहा कोटींचा दंड

CD

पुणे, ता. १८ : पुणे - मुंबई द्रुतगतीमार्ग व पुणे - सातारा राष्ट्रीय महामार्गावर एसटी बस चालविणाऱ्या हजारो चालकांना वाहतूक नियम मोडणे महागात पडले आहे. वेग मर्यादा आणि इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) विविध आगारांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयांकडे (आरटीओ) एकूण सुमारे सहा कोटी रुपयांचा दंड भरला आहे. ही रक्कम आता संबंधित चालकांच्या पगारातून कपात करून वसूल केली जात आहे.

द्रुतगती मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे दंड आकारला जात असून, नियमभंग करणाऱ्या वाहनांच्या क्रमांकावर थेट दंड लावण्यात येत आहे. प्रशासनाने द्रुतगती मार्गावर ताशी ८० किमी व घाटात ४० किमी वेग मर्यादा निश्चित केली आहे. मात्र वेळेवर पोहोचण्याच्या दबावामुळे अनेक चालकांना वेग वाढवावा प्रसंगी लेन कटिंग देखील करावे लागत असल्याचे काही चालकांनी सांगितले आहे. सर्वाधिक दंड हा वेग मर्यादांचे उल्लंघन केल्या प्रकरणी झाला आहे. त्यामुळे पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावर व पुणे - सातारा महामार्गावर प्रवास करणे एसटी चालकांना चांगलेच महागात पडले आहे. वेग मर्यादेचे उल्लंघन, लेन कटिंग, चुकीच्या ठिकाणी गाडी थांबविणे, सिग्नलचे उल्लंघन आदी विविध कारणांमुळे देखील एसटी चालकांवर कारवाई केली जात आहे.

वेळेसाठी चालकांची धडपड
एसटी गाड्यांचे वेळापत्रक ठरलेले असते. कोणत्या स्थानकावर किती वाजता पोहोचणे आहे, हे ठरलेले आहे. पण मार्गात अनेकदा वाहतूक कोंडी अथवा अपघातासारखे प्रसंग निर्माण होतात. त्यामुळे वेळापत्रकाचे पालन करण्यासाठी एसटी चालकाकडून लेन कटिंग किंवा वेग मर्यादांचे उल्लंघन होत असल्याचे एसटी कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे. मिळालेल्या माहितीनुसार सर्वाधिक दंड ठाणे आगाराने भरलेला आहे. ठाणे आगाराला सुमारे ८० लाख रुपये दंड झाला असल्याची माहिती एसटीतील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

असा होतो दंड
- वेग मर्यादेचे उल्लंघन : ४ हजार रुपये
- लेन कटिंग : १ हजार रुपये
- सिग्नल उल्लंघन : ५०० रुपये
- गर्दीच्या ठिकाणी गाडी थांबविल्यास : १५०० रुपये
- नियमित थांब्याशिवाय दुसरीकडे गाडी थांबविल्यास : १५०० रुपये

एसटी ही सार्वजनिक सेवा आहे. अनेकदा विशिष्ट परिस्थितीत प्रवाशांना ठरवून दिलेल्या वेळेत इच्छित स्थळी पोहोचविण्यासाठी काही वेळा वेग मर्यादा काही प्रमाणात वाढल्यास त्यावर दंड होता कामा नये. राज्याच्या परिवहन विभागाने एसटीला दंडाच्या प्रक्रियेत शिथिलता द्यावी.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyan Bharatam Yojana: आता भारताचा भाषिक वारसा संरक्षित होणार! नव्या योजनेची घोषणा, 'ज्ञान भारतम' योजना म्हणजे नेमकी काय?

Video: हेच खरंखुरं स्वातंत्र्य! पुणे महागनर पालिकेच्या सुरक्षेची कमान तृतीयपंथीयांच्या हाती

Latest Marathi News Live Updates : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

श्री कृष्ण जन्माष्टमीनिमित्त प्रियजनांना पाठवा मराठीतून खास शुभेच्छा,पाहा एकापेक्षा एक सुंदर मॅसेज

Independence Day: ...म्हणून देश एकसंध राहिला, नाहीतर...; इतिहास सांगत काँग्रेस नेते मोदींना नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT