पुणे

प्राध्यापक भरतीच्या अर्जांसाठी २१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

CD

पुणे, ता. ८ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापक भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना आता २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.
विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभागांमधील शासनमान्य प्राध्यापक, सहयोगी, प्राध्यापक, सहायक प्राध्यापक या संवर्गातील एकूण १११ रिक्त शिक्षकी पदांच्या भरतीसाठी १३ सप्टेंबर २०२४ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या ६ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या निर्णयानुसार, विद्यापीठातील शासनमान्य शिक्षकीय पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची मुदत ८ नोव्हेंबरपासून ७ डिसेंबरपर्यंत होती. त्याचप्रमाणे ऑनलाइन पद्धतीने अर्ज केलेल्या उमेदवारांना अर्जाची प्रत आणि संबंधित कागदपत्रे प्रशासन शिक्षक कक्षाकडे सादर करण्यासाठी शुक्रवारी (ता. १२) सायंकाळी सहापर्यंत मुदत होती.
शासनमान्य शिक्षकीय पदांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यास २१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज केलेल्या उमेदवारांना अर्जाची प्रत आणि संबंधित कागदपत्रे प्रशासन शिक्षक कक्षाकडे सादर करण्यासाठी २६ डिसेंबर सायंकाळी सहापर्यंत मुदतवाढ दिली आहे. दरम्यान, १३ सप्टेंबर २०२४ च्या जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांच्या अर्जामध्ये बदल किंवा सुधारणा करता येऊ शकते. या मुदतीमध्ये नवीन उमेदवारदेखील अर्ज करू शकतील, असे विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
...............
इन्फोबॉक्स :
विद्यापीठातील रिक्त पदांचा तपशील
पदाचे नाव : पदांची संख्या
सहाय्यक प्राध्यापक : ४७
सहयोगी प्राध्यापक : ३२
प्राध्यापक : ३२
एकूण : १११

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kharmas 2026: 15 मार्चपासून बदलणार ग्रहस्थिती! सूर्य मीन राशीत; का करू नयेत शुभ काम?

स्टार प्रवाहचा झी मराठीला दणका! कमळी, स्वानंदीने स्थान गमावलं; टीआरपी आपटला, पहिल्या स्थानावर कोण?

Latest Marathi News Live Update : ग्रामीण भागातही गॅससाठी रांगा, मोवाड-नरखेडमध्ये नागरिकांची सकाळपासून गर्दी

Kolhapur Headmaster Tragedy : निलंबनाचे नैराश्य मुख्याध्यापकाने थेट आंब्याच्या झाडाला घेतला गळफास, कोल्हापुरातील घटना

Gold Rate Today: सलग तिसऱ्या दिवशी सोनं स्वस्त! 20 दिवसांतील सर्वात कमी दर, 10 तोळ्यांमागे 36,500 रुपयांची घसरण; पाहा आजचा भाव

SCROLL FOR NEXT