पुणे, ता. ७ ः स्वामी विवेकानंद आणि विश्वशांतिदूत महर्षी विनोद यांची जयंती तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आत्मयोग-गुरू डॉ. संप्रसाद विनोद यांच्या सुवर्णसाधनेच्या अमृतयोग वर्षानिमित्त रविवारी (ता. १२) ‘महाध्यान शिबिर’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. या शिबिरात ध्यानाचे स्वरूप, त्याचा दैनंदिन जीवनाशी संबंध, मानसिक ताणाचे नियोजन, अशा विविध विषयांची ओळख करून देण्यात येणार आहे.
या वेळी खासदार मेधा कुलकर्णी, पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, माजी मंत्री दिवाकर रावते, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर आदी उपस्थित राहणार आहेत. हे शिबिर सर्वांसाठी विनामूल्य खुले असून, ‘https://forms.gle/iZ6qNQ 552dN CuS1z7.’ या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.