पुणे

इन्स्टंट पीठे व इन्स्टंट प्रीमिक्स

CD

सध्याच्या धावपळीच्या युगात इन्स्टंट फूडला बाजारपेठेमध्ये खूप मागणी आहे. हे लक्षात घेऊन इन्स्टंट पीठे व इन्स्टंट फूड प्रीमिक्स तयार करण्यास शिकवणारी कार्यशाळा १४ डिसेंबर रोजी होणार आहे. यामध्ये डोसा, इडली, आइस्क्रीम, गुलाबजामून, पोहे, उपमा, पराठा, थालीपीठ, ढोकळा, पकोडा, दाल खिचडी, पुलाव, सरबत, मिल्कशेक, केक, मल्टीग्रेन पराठा, खीर, रबडी या सर्वांचे प्रीमिक्स हे पदार्थ कृतीसह शिकवले जातील. या उत्पादनांना बाजारपेठेत असलेल्या संधी, प्रॉडक्ट मार्केटिंग, कॉस्टिंग, पॅकिंग, लेबलिंग, आवश्यक मशिनरी इ.विषयी मार्गदर्शन होणार आहेत. कार्यशाळा पूर्ण केल्यास नोट्स व डिजिटल प्रमाणपत्र मिळेल.

गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन प्रशिक्षण
सोसायटी मॅनेजर या करिअर संधीविषयीचे तीनदिवसीय प्रमाणपत्र प्रशिक्षण एसआयआयएलसी आणि पुणे हाउसिंग फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १९, २० व २१ डिसेंबर रोजी आयोजिले आहे. यामध्ये सोसायटी मॅनेजरची कर्तव्ये, प्रोफाइल आणि जबाबदाऱ्या, मॅनेजिंग कमिटी अजेंडा व मिनिट्स लेखन, गृहनिर्माण संस्थेतील शेअर्स आणि व्याजाचे हस्तांतर, देखभाल बिले तयार करणे, टीडीएस भरणे, ऑडिटसाठी चेकलिस्ट, लेखापरीक्षण अहवाल तयार करणे, सोसायटीचे वार्षिक विवरणपत्र सादर करणे आदी विषयांचा समावेश आहे. प्रशिक्षणार्थींना प्रात्यक्षिक अनुभवाची संधीही दिली जाणार आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यास गृहनिर्माण संस्थांमध्ये सोसायटी व्यवस्थापक म्हणून अर्धवेळ किंवा पूर्णवेळ करिअर संधी उपलब्ध होऊ शकते अथवा गृहनिर्माण संस्थांना विविध सेवा देऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो.

यू-ट्यूबर होण्यासाठी प्रमाणपत्र प्रशिक्षण
‘बिकम अ सर्टिफाइड यू-ट्यूबर’ ही चार दिवसांची कार्यशाळा २७ व २८ डिसेंबर तसेच ३ व ४ जानेवारी रोजी आयोजिली आहे. ज्यांना य-ूट्यूब व इतर माध्यमांद्वारे कंटेंट क्रिएटर व्हायचे आहे अथवा जे आधीच असे क्रिएटर आहेत, त्यांना स्वतःची पोहोच वाढवायची आहे, अशांना ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे. वास्तविक उदाहरणे, प्रात्यक्षिकाद्वारे शिकवण्यावर असलेला भर आणि एआयचा उपयोग हे कार्यशाळेचे वैशिष्ट्य आहे. यू-ट्यूबद्वारे कमाई, चॅनेल कसे तयार करावे, कथा व पटकथा यांचे लेखन कसे करावे, कॅमेरा, ध्वनी, प्रकाशयोजना आणि संकलनाचे तंत्र वापरून चांगला कंटेंट कसा तयार करता येईल याचे उपयुक्त मार्गदर्शन कार्यशाळेत होणार आहे. सोबतच यू-ट्युब विश्लेषण, लघुपट निर्मिती, निर्मितीपूर्व कामे, निर्मितीनंतरची कामे, मार्केटिंग, एसईओ व अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोचण्याचे विविध तांत्रिक मार्ग, हक्क आणि कायदेशीर बाबी आदींबद्दलही मार्गदर्शन होणार आहे.

‘एसआयआयएलसी’च्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी संपर्क : ८४८४८११५४४, ९३५६९७३४२७, ८९५६३४४४७२

Ladki Bahin: लाडक्या बहिणींसाठी २०० कोटींची तरतूद; राज्यात १० मॉल उभे करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

US Birth Tourism: गर्भधारणेदरम्यान अमेरिकेत प्रवास करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा! यूएस दूतावासाकडून व्हिसा रद्द करण्याचा इशारा, कारण काय?

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात १९ तारखेला दोषारोप निश्चिती? सुनावणीत नेमकं काय घडलं?

Pune News : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात ३ हजार कोटींचा विकासधडाका; सोमवारी मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम!

Latest Marathi News Live Update: पवईत आढळले दोन अजगर, रेस्क्यू टीम घटनास्थळी

SCROLL FOR NEXT