पुणे

शिक्षक भरतीच्या पोर्टलवर स्व-प्रमाणपत्रासाठी मुदत

CD

पुणे, ता. १६ : मे आणि जूनमध्ये ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी- २०२५’ परीक्षा दिलेल्या उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र तयार करण्यासाठी शिक्षक भरतीच्या पोर्टलवर सुविधा देण्यात आली आहे. उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी २९ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे.
‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी २०२५’ ही परीक्षा २७ ते ३० मे आणि २ ते ५ जून दरम्यान ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. या चाचणीसाठी दोन लाख २८ हजार ८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती. ही चाचणी दिलेल्या उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र तयार करण्यासाठी पोर्टलवर सुविधा दिली आहे. टीईटी आणि सीटीईटीच्या माहितीमध्ये तफावत येईल, अशा उमेदवारांना राज्यातील त्यांनी निवडलेल्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांच्याकडून उमेदवार आपणच असल्याचे सिद्ध करण्याचा विनंती अर्ज, ओळखीचे पुरावे, संबंधित कागदपत्रे यांसह संपर्क साधण्यात याव्यात, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. उमेदवारांना त्यांच्या लॉगिनवर ‘रिक्वेस्ट फॉर चेंज इन डेटा’ या मेनुअंतर्गत सुविधा दिली आहे. उमेदवारांना त्यांच्या सोयीचा जिल्हा निवडता येणार आहे, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TET पेपरफुटी प्रकरणी पहिली कारवाई, भिवंडीतून तीन आरोपींना अटक; पेपर लीक करणारे हात नेमके कुणाचे?

Mumbai News: ऑफर पडली महागात! ग्राहकांच्या गर्दीने शोरूमला सेल रद्द करण्याची वेळ; इन्फिनिटी मॉलमध्ये गोंधळ

TET चा पेपर नेमका कसा फुटला? भिवंडीत काय घडलं? परीक्षा अचानक रद्द; राज्य परीक्षा परिषदेचं पत्र आलं समोर

Latest Marathi News Live Update : ऑपरेशन टायगरच्या यशानंतर श्रीकांत शिंदे शनी चरणी होणार नतमस्तक...

Lorcan Tucker: भारताविरुद्ध आता मालिकाच जिंकलो, तर...' आयर्लंडचा कर्णधार ऐतिहासिक विजयानंतर नेमकं काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT