पुणे, ता. १ : गंगाधाम चौकात सातत्याने होत असलेल्या अपघातांना लगाम घालण्यासाठी वाहतूक शाखेने कात्रज-कोंढवा रस्त्यावरील शत्रुंजय मंदिर (कान्हा हॉटेल) ते गंगाधाम चौक तसेच, टिळेकर चौक ते गंगाधाम चौकादरम्यान ट्रक, मिक्सर, डंपर, कंटेनरसह सर्व जड व अवजड वाहनांना वाहतुकीसाठी २४ तास बंदी घातली आहे. हा आदेश मंगळवारपासून लागू झाला आहे.
कात्रज-कोंढवा मार्गावरून गंगाधाम चौकाकडे उतरताना तीव्र उतारामुळे वाहनांचा वेग अनियंत्रित होत असल्याने गेल्या काही महिन्यांत अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मार्केट यार्ड परिसरातील गंगाधाम चौकात ११ जूनला भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दीपाली सोनी (वय २८) यांचा मृत्यू झाला. त्या दुर्घटनेनंतर वाहतूक शाखेने या मार्गावर सुरक्षिततेच्या दृष्टीने ‘नो एन्ट्री’चा आदेश काढला आहे.
वाहतूक शाखेने जड वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. नियम मोडणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
काय आहे आदेश?
जड-अवजड वाहनांना २४ तास बंदी
शत्रुंजय मंदिर- गंगाधाम चौक
टिळेकर चौक- गंगाधाम चौक
जड-अवजड वाहनांना प्रवेशबंदी (सकाळी ८ ते रात्री १०)
लुल्लानगर कोंढवा- गंगाधाम चौक- चंद्रलोक हॉस्पिटल चौक
गंगाधाम चौक- वखार महामंडळ चौक- सेव्हन लव्हज् चौक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.