पुणे

वडगावात गजानन ज्वेलर्समध्ये भरदिवसा चोरट्यांकडून लूट

CD

पुणे/सिंहगड रस्ता, ता. १ : सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव येथील रेणुका नगरीमधील गजानन ज्वेलर्स दुकानात तीन चोरट्यांनी भरदिवसा शस्त्रांचा धाक दाखवत पाच तोळे सोन्याचे दागिने लुटून नेले. यावेळी चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास हा प्रकार घडला.
रेणुका नगरी परिसरात शंकरराव पोपट घाडगे यांचे गजानन ज्वेलर्स हे दुकान आहे. त्यांच्या पत्नी मंगल घाडगे (वय ५५) यादेखील त्यावेळी दुकानात होत्या. पाउंजाई मंदिराकडून दुचाकीवर तिघेजण हातात कोयता आणि बंदूक घेऊन आले. चोरट्यांनी चेहऱ्यावर मास्क बांधला होता. तिसराजण दुचाकीवर बाहेर उभा राहिला. चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून दुकानात जबरदस्तीने प्रवेश केला. त्यांनी दुकानमालक शंकर घाडगे आणि त्यांच्या पत्नी मंगल घाडगे यांना धमकावले. या वेळी मंगल घाडगे यांनी विरोध केल्याने चोरट्यांनी त्यांच्या डोक्यावर आणि दंडावर कोयत्याने वार केला. यामध्ये त्या जखमी झाल्या.
चोरट्यांनी दुकानातील शोकेस फोडून पाच सोन्याच्या चेन आणि एक नेकलेस असे साडेचार लाख रुपयांचे दागिने चोरून नेले. या वेळी शेजारील दुकानदारांनी चोरट्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्यावर पिस्तूल रोखून धरल्याने त्यांना काही करता आले नाही. त्यानंतर चोरटे तेथून पसार झाले.
याबाबत माहिती मिळताच परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप दाइंगडे यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात येत आहे, अशी माहिती कदम यांनी दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक समीर कदम तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Video: दिवसाढवळ्या 'हॉटेल भाग्यश्री'ची फसवणूक! 'ही' आयडिया करुन लोक पैसे उकळायला लागले अन् फुटक खाऊ लागले

Viral Video: लग्नासाठी मुलगा आहे का? मुलीची अनोखी मागणी, दारुडा हवा नवरा, ५ लाख देणार हुंडा! ही 'डील' मिस करू नका!

Palghar News: महिनाभर 'या' पालघर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाचा अलर्ट; काय आहेत पर्यायी मार्ग?

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

SCROLL FOR NEXT