पुणे, ता. २ : महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (डायल १०८) ही २६ जानेवारी २०१४ पासून राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत सुरू झाली असून, आजपर्यंत राज्यातील एक कोटी १० लाख रुग्णांना तातडीची वैद्यकीय मदत पोहोचवण्यात यश मिळाले आहे. या अंतर्गत ९३७ रुग्णवाहिका कार्यरत आहेत, ज्यामध्ये २३३ अॅडव्हान्स्ड लाइफ सपोर्ट आणि ७०४ बेसिक लाइफ सपोर्ट रुग्णवाहिकांचा समावेश आहे.
अपघात, हृदयविकार, प्रसूतीकळा सुरू झालेल्या मातेला रुग्णालयात घेऊन जाणे, जळीत घटना, उंचावरून पडणे आदी तातडीच्या रुग्णांना या रुग्णवाहिकेद्वारे मोफत सेवा दिली जाते. त्याचे हे अकरावे वर्ष आहे. ही सेवा २४ तास कार्यरत असून शहरी, दुर्गम, आदिवासी भागांसह महामार्गांवरही त्वरित सेवा मिळवून देण्यावर भर देण्यात येतो. अपघात, हृदयविकार, मोठ्या जखमा यांसारख्या वैद्यकीय आपत्कालीन घटनांमध्ये या रुग्णवाहिका अत्याधुनिक उपकरणांसह सज्ज असतात.
दरम्यान, या सेवेच्या कर्मचाऱ्यांनी १ जुलैला संप पुकारला होता. याबाबत महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, रुग्णसेवेत कुठलाही अडथळा आलेला नाही आणि सकाळपासून गंभीर वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमध्ये सेवा नियमितपणे सुरू ठेवली आहे. काही जिल्ह्यांतील चालक आणि काही कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवरही ही सेवा सुरळीत सुरू आहे, अशी माहिती ‘डायल १०८’चे जिल्हा व्यवस्थापक डॉ. प्रियांक जावळे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.