पुणे

डॉ. कुरुलकरकडून दोषमुक्तीसाठी अर्ज

CD

पुणे, ता. ४ : ‘डीआरडीओ’चे माजी संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी हनी ट्रॅप प्रकरणात पाकिस्तानी हस्तक महिलेला देशाच्या सुरक्षेशी संबंधित माहिती पुरविल्याचा आरोप आहे. परंतु ही माहिती गोपनीय आहे की नाही, हे स्पष्ट नसल्याने शासकीय गुपिते कायदा लागू होणार नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला. दरम्यान, या खटल्यातून दोषमुक्त करण्याबाबत डॉ. कुरुलकर यांनी विशेष न्यायालयाकडे अर्ज केला आहे.
संरक्षण, संशोधन व विकास संस्थेचे (डीआरडीओ) माजी संचालक डॉ. कुरुलकर यांना मे २०२३ मध्ये पाकिस्तानी हस्तक महिलेच्या ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकून, तिला गोपनीय दस्तऐवज पुरवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यांच्या विरोधात शासकीय गुपिते कायद्याच्या कलम ३(१)(सी), ४ आणि ५ अंतर्गत गुन्हे दाखल आहेत.
या प्रकरणात आरोपीच्या बाजूने वकील अ‍ॅड. ऋषिकेश गानू यांनी विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या समोर युक्तिवाद केला. ‘गोपनीय’, ‘अत्यंत गोपनीय’, ‘क्लासिफाइड’अशा विविध प्रकारांची व्याख्या करत, माहितीचे स्वरूप स्पष्ट न झाल्यास संबंधित कायद्याची कलमे लागू होऊ शकत नाहीत, असे त्यांनी अधोरेखित केले. एफआयआर आणि संबंधित फॉरेन्सिक अहवालात माहितीचा उल्लेख असला, तरीही ती शासकीय गुपिते अधिनियमाअंतर्गत येते की नाही, हे ठरवण्यासाठी तिचे स्वरूप समजणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद गानू यांनी मांडला.
यापूर्वी कुरुलकर यांनी न्यायालयीन कोठडीत असताना जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र तो विशेष न्यायालयाने फेटाळून लावला होता. आता बचाव पक्षाने थेट खटल्यातूनच दोषमुक्ततेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी या प्रकरणातील आरोप निश्चितीचा मसुदा न्यायालयात सादर केला आहे. या अर्जावरील पुढील सुनावणी १५ जुलै रोजी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM kisan 22nd Installment : पंतप्रधान मोदी आज 'पीएम किसान' चा २२ वा हप्ता जारी करणार; तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? असं चेक करा

Phaltan News: पाइपमध्‍ये अडकून तिघांचा मृत्‍यू; फलटण तालुक्यातील पाेटपाटातील घटना, तिघेही ओरिसातील पाेल्‍ट्री कामगार, काय घडलं!

Dharashiv News: उमरग्यात गॅससाठी लांब रांगा; बुकिंग केल्यानंतरही १५ दिवस प्रतीक्षा;सिलिंडर उशिरा मिळत असल्याने ग्राहक त्रस्त

Parbhani Gas Booking Trouble: गॅस सिलिंडर बुकिंग सर्व्हर डाउन, ऑनलाइन नोंदणी ठप्प, परभणी गॅस एजन्सी गर्दी

बोर्डाचे शिक्षकांना आदेश! दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी शाळेतच बंधनकारक; २१ दिवसांसाठी २१ दिवसांची मुदत, आता उत्तरपत्रिकांचे गठ्ठे इतिहासजमा

SCROLL FOR NEXT