पुणे

अग्निशामक जवानामुळे वाचले चिमुकलीचे प्राण

CD

पुणे, ता. ८ : इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील खिडकीतून पडण्याच्या स्थितीत असलेल्या चिमुकलीचे प्राण अग्निशामक दलाच्या जवानाच्या प्रसंगावधानामुळे वाचले. जवान योगेश चव्हाण यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना कात्रजमधील गुजर निंबाळकरवाडी परिसरात घडली.

मंगळवारी (ता. ८) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास गुजर निंबाळकरवाडी येथील सोनवणे बिल्डिंगमधील भाविका चांदणे (वय ४) ही मुलगी तिसऱ्या मजल्यावरील बेडरूमच्या खिडकीतून बाहेर पडण्याच्या अवस्थेत अडकली होती. तिची आई दुसऱ्या मुलीला शाळेत सोडायला गेली होती. घरात इतर कोणीही नव्हते. हे दृश्य पाहून शेजारी राहणारे उमेश सुतार यांनी आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून जवान योगेश चव्हाण त्यांच्या गॅलरीत आले. त्यावेळी ती मुलगी खिडकीच्या ग्रिलला एका हाताने धरून बाहेर लटकत होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत चव्हाण तातडीने तिसऱ्या मजल्यावर पोहोचले. पण घराला कुलूप होते. तेवढ्यात मुलीची आई शाळेतून घरी आली. दरवाजा उघडताच चव्हाण यांनी भाविकाला खिडकीच्या ग्रिलमधून आत ओढून घेत तिचा जीव वाचविला.

मुलीचा जीव वाचल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. भाविकाच्या आईच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. ‘एक क्षण जरी उशीर झाला असता तर, मोठी दुर्घटना घडली असती,’ असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. योगेश चव्हाण हे पुणे अग्निशामक दलात तांडेल पदावर कार्यरत आहेत. त्यांनी दाखवलेली जबाबदारीची भावना आणि धाडसाचे कौतुक होत आहे.

पालकांनी लहान मुलांना घरात एकटे न सोडण्याचे आणि सतर्क राहण्याची गरज आहे. लहान मुलांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष जिवावर बेतू शकते. मुलीचे प्राण वाचविल्याचा अभिमान वाटतो.
- योगेश चव्हाण, तांडेल, अग्निशामक केंद्र कोथरूड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishi Sunak : ब्रिटनचे माजी पंतप्रधान करणार नोकरी, जिथं समर ट्रेनी होते तिथंच बनले वरिष्ठ सल्लागार; किती वेतन?

150 Years Of BSE: बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला 150 वर्षे पूर्ण; आशियातील पहिला शेअर बाजार कोणी सुरु केला होता?

Guru Purnima 2025: गुरुपौर्णिमेचा ऋषी व्यास आणि गौतम बुद्धांशी काय आहे संबंध? जाणून घ्या सविस्तर

Vidarbha Rain : विदर्भात दुसऱ्या दिवशीही पावसाची रिपरिप; भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक, पावसाचे तीन बळी

Sharad Pawar : शिक्षकांना पावसात आंदोलन का करावे लागते? न्यायाची जबाबदारी टाळता येणार नाही; शरद पवार यांचे सरकारला खडे बोल

SCROLL FOR NEXT