पुणे

राज्याला गृहमंत्री आहे का?

CD

पुणे, ता. २१ : ‘राज्याला गृहमंत्री आहे का? असेल तर ते काय करीत आहेत?,’’ अशा शब्दांत पुणे शहरातील माजी आमदारांनी विधान भवन येथे घडलेल्या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे. विधिमंडळात जनहिताचे रक्षण करणे, जनताभिमुख धोरणे अमलात आणून राज्याचा विकास करणे ही कामे अपेक्षित असताना सध्या मात्र गंगा उलट्या दिशेने वाहू लागली आहे, असेही ते म्हणाले.

विधान भवनाच्या परिसरात आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. त्या घटनेनंतर माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी, रामदास फुटाणे, ॲड. एल. टी. सावंत, माजी खासदार ॲड. वंदना चव्हाण आणि युवक क्रांती दलाचे सहकार्यवाह राहुल डंबाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन घडलेल्या घटनेचा निषेध केला.

गोपीचंद पडळकर हे सरकार पक्षाचे प्रतिनिधित्व करतात. ते मुख्यमंत्र्यांचे खास, विशेष लाडके आहेत. सातत्याने विरोधी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना अर्वाच्य भाषेत लाखोली वाहणे हे त्यांच्यावर सोपविलेले काम ते निष्ठेने फार पाडत असतात, परंतु त्यांनी आता कळस गाठला. विधानसभेच्या सुरक्षित परिसरात ते नामचीन गुन्हेगारांना घेऊन आले. त्या गुंडांमार्फत विरोधी पक्षाच्या आमदारांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री एकच आहेत. त्यांना हे रोखता आले नाही का? लोकशाहीचे मंदिर तोच उद्ध्वस्त करू शकतो, ज्याला ते मान्य नाही. जनतेच्या मूळ प्रश्‍नाकडे दुर्लक्ष केले जात आहे. बस्‌ झाले तुमचे हे नाटक, आता मूळ प्रश्‍नांकडे लक्ष द्या, अशी जनतेने त्यांना जाब विचारण्याची वेळ आली आहे, असेही हे आमदार म्हणाले.

--------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate: मला रमी खेळता येत नाही, विरोधकांना कोर्टात खेचणार! कोकाटेंनी केली सखोल चौकशीची मागणी

Radhakrishna Vikhe: हनी ट्रॅपचे पुरावेतर आधी द्या: राधाकृष्ण विखे पाटील;'ज्यांना सीडी दाखवायची त्यांनी दाखवावी'

MS Dhoni ला वाटतेय भारतीयांच्या तंदुरुस्तीची चिंता; स्वतःच्या मुलीचं उदाहरण देत म्हणाला, माझी मुलगी... Video Viral

अर्जुनने पुराव्यानिशी कोर्टात उघड केला साक्षीचा खोटेपणा; "आता त्या तन्वीला पण.." प्रेक्षकांनी केली मागणी

Latest Maharashtra News Updates : नवी मुंबई शहरात मुसळधार पावसाला सुरुवात

SCROLL FOR NEXT