पुणे

‘टीओडी’ मीटरबाबत अफवांना बळी पडू नका ‘महावितरण’चे आवाहन ः पुणे परिमंडलात चार लाख नवे मीटर बसवले

CD

पुणे, ता. २१ ः ‘महावितरण’कडून वीजग्राहकांना ‘टीओडी’ वीजमीटर मोफत बसविले जात आहेत. पुणे परिमंडलात आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या चार लाखांहून अधिक ग्राहकांना वीजमीटर बसविण्यात आले असून, त्यांचे अचूक वीजबिल तयार होत आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी अफवांना बळी न पडता हे मीटर बसविण्यास सहकार्य करावे, असे आवाहन ‘महावितरण’ने केले आहे.
वीजग्राहकांना वीजबिल त्यांच्या वापरानुसार अचूक व वेळेत मिळावे, यासाठी ‘महावितरण’ रीडिंगसाठी नवनवीन तंत्रज्ञान स्वीकारून वीजबिल तयार करत असते. वीजमीटरचे रीडिंग घेण्यासाठी लागणारा वेळ व त्यात होणाऱ्या मानवी चुका टाळण्यासाठी महावितरणने आता ‘टीओडी’ मीटर बसविण्याचे धोरण स्वीकारले आहे.
हे मीटर अत्याधुनिक आहेत. यात ग्राहकाला त्याचा वीजवापर मोबाइलमधून केव्हाही व कोठूनही तपासता येतो. त्यासाठी ‘महाविद्युत’ हे ॲप विकसित करण्यात आले आहे. नवीन मीटरमुळे ‘महावितरण’ला रीडिंग घेण्यासाठी कोणा बाह्यव्यक्ती अथवा कर्मचाऱ्यांवर अवलंबून राहावे लागणार नाही. त्यामुळे ठरलेल्या तारखेला व काही क्षणांत मीटरची रीडिंग ऑनलाइन प्राप्त होते. शिवाय ती अचूक असते. त्यामुळे वीजबिल विनाविलंब तयार होऊन ग्राहकाला उपलब्ध होते, तसेच सौरऊर्जेमुळे ‘महावितरण’ला स्वस्त विजेची उपलब्धता दिवसा अधिक होत आहे. ही स्वस्त वीजग्राहकांना दिवसा उपलब्ध करून देण्यासाठी ‘टीओडी’ मीटर आवश्यक आहे.
दुसरी अफवा म्हणजे हे मीटर प्रीपेड आहेत. त्यामुळे रात्री-अपरात्री रिचार्ज संपल्यावर काय करायचे, अशाही अफवा सोशल मीडियावर येत आहेत. यातही तथ्य नाही. हे मीटर पूर्वीच्या मीटरप्रमाणेच पोस्टपेड असतील. महिनाभराच्या वापरानंतर नेहमीसारखेच घरपोच किंवा ऑनलाइन वीजबिल ग्राहकांना मिळणार आहे.
काही ठिकाणी या नवीन मीटरला अनाठायी विरोध केला जात आहे. विजेचे बिल जास्त येत नाही तर ते अचूक असेल. ज्या ग्राहकांना मीटरवर शंका आहे, त्यांनी ‘महावितरण’च्या विभागाशी संलग्न असलेल्या मीटर चाचणी कक्षात त्याची प्रत्यक्ष पडताळणी करू शकतात. येथे जुन्या व नवीन मीटरवर समान वीजभार टाकून ग्राहकाला मीटर तपासून देण्याची सोय आहे. त्यामुळे ऐकीव किंवा सोशल मीडियावर आलेल्या अफवांना बळी पडू नये, असे आवाहन मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी केले आहे.
---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jagdeep Dhankhar : नड्डा-रिजिजूंची अनुपस्थिती, बैठक पुढे ढकलावी लागली; धनखड नाराज? अचानक राजीनाम्याने नवा वाद

Latest Maharashtra News Updates : वाशिम च्या पैन गंगा नदीला आला मोठा पूर…

Asia Cup 2025: पाकिस्तानची कोंडी! BCCI ला दोन देशांचा फुल सपोर्ट... शेजाऱ्यांना 'नाक दाबून बुक्क्याचा मार'

Railway Survey: सोलापूर-संभाजीनगर रेल्वेमार्गाचा हवाई सर्व्हे; रेल्वेने थेट जोडले जाणार धाराशिव-बीड-संभाजीनगर-चाळीसगाव

'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत काही दिवस दिसणार नाहीये काव्या; तो फोटो दाखवत अभिनेत्रीने सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT