
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपण राजीनामा देत असल्याचं कारण जगदीप धनखड यांनी सांगितलंय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी धनखड यांचा राजीनामा स्वीकारला आहे. मात्र अचानक राजीनामा दिल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. धनखड यांनी जरी प्रकृतीचं कारण दिलं असलं तरी विरोधकांसह राजकीय विश्लेषकांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.