पुणे

गणेश मंडळांच्या बैठकीत गोंधळ महापालिकेत पर्यावरणवादी व हिंदी बोलण्याला जोरदार विरोध

CD

पुणे, ता. २१ ः गणेशोत्सवाच्या तयारीसाठी महापालिका प्रशासनाने सोमवारी बोलाविलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत गोंधळ उडाला. बैठक गणेशोत्सव मंडळांसाठी असताना त्यामध्ये पर्यावरणवादी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी कसे आले? असा आक्षेप गणेशोत्सव मंडळांनी घेतला. बैठकीतच एकाने हिंदीतून संवाद साधण्यास सुरवात केल्याने कार्यकर्त्यांनी त्यास जोरदार विरोध दर्शविल्याने गोंधळात आणखी भर पडली. गणेशोत्सवामध्ये महापालिका प्रशासन गणेशोत्सव मंडळांसमवेत असेल, असे सांगत मंडळांनी उत्सवाच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश देण्याचे आवाहन महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केले.
बैठकीला आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी, एम. जे. प्रदीप चंद्रन यांच्यासह उपायुक्त, सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. तर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, अखिल मंडई मंडळाचे विश्‍वस्त विश्‍वास भोर, राष्ट्रीय साखळीपीर तालीम मंडळाचे रवींद्र माळवदकर यांच्यासह धीरज घाटे, बाप्पू मानकर, दीपक पोटे, संदीप काळे, ऋषीकेश बालगुडे आदी उपस्थित होते.
गणेशोत्सव मंडळांची बैठक सुरू झाल्यानंतर पर्यावरणप्रेमी काही स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी उत्सवाबाबत आपली भूमिका मांडण्यास सुरवात केली. त्यामध्ये ध्वनिप्रदूषण, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या (पोओपी) मूर्तीचा होणारा वापर टाळण्याबाबत आपले म्हणणे मांडण्यास सुरवात केली. त्यावेळी गणेशोत्सव मंडळांनी त्यास विरोध दर्शविला. संबंधित बैठक ही गणेशोत्सव मंडळांसाठी आहे, त्यामुळे आम्हाला बोलण्याची संधी द्या, या बैठकीस पर्यावरणवादी, स्वयंसेवी व सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते उपस्थित कसे ? असे प्रश्‍न उपस्थित करत कार्यकर्त्यांनी आक्षेप नोंदविला. दरम्यान, आयुक्‍तांनी संबंधित प्रकाराची दखल घेत, यापुढे आवश्‍यक काळजी घेतली जाईल, असे स्पष्ट केले. त्यानंतरही स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधीने आपले बोलणे पुढे रेटण्याचा प्रयत्न केल्यानंतर कार्यकर्त्यांना संताप अनावर झाला. कार्यकर्त्यांनी महिला प्रतिनिधीस बोलण्यास मज्जाव केला. दरम्यान, आणखी एका स्वयंसेवी प्रतिनिधीने थेट हिंदी भाषेतून संवाद साधण्यास सुरवात केली. त्यावेळी कार्यकर्ते व सुरक्षारक्षक संबंधित प्रतिनिधीच्या अंगावर धावून गेले. त्यास मराठीतून बोलण्याचा आग्रह केल्यानंतरही तो हिंदीतूनच बोलत राहिल्याने गोंधळात आणखी भर पडली. दरम्यान, संबंधित प्रतिनिधीस सभागृहाबाहेर काढल्यानंतर गोंधळ कमी झाला. दरम्यान, मंडळांच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता, महिलांसाठी स्वच्छतागृहे, पीएमपीएल, मेट्रोसेवा, सुरक्षितता यासंदर्भातील आपल्या सूचना बैठकीत मांडल्या.
----------
आयुक्त म्हणाले,
- गणेशोत्सव मंडळांना महापालिकेचे सर्वतोपरी सहकार्य
- गणेशोत्सव मंडळांच्या सूचनांनुसार प्रश्‍न सोडविण्यावर भर देणार
- विसर्जन मिरवणुकीत रात्रीच्यावेळी स्वागतासाठी वरिष्ठ अधिकारी थांबतील.
- रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी मोबाईल ऍप्लिकेशन तयार

---------

Manikrao Kokate: मला रमी खेळता येत नाही, विरोधकांना कोर्टात खेचणार! कोकाटेंनी केली सखोल चौकशीची मागणी

Radhakrishna Vikhe: हनी ट्रॅपचे पुरावेतर आधी द्या: राधाकृष्ण विखे पाटील;'ज्यांना सीडी दाखवायची त्यांनी दाखवावी'

MS Dhoni ला वाटतेय भारतीयांच्या तंदुरुस्तीची चिंता; स्वतःच्या मुलीचं उदाहरण देत म्हणाला, माझी मुलगी... Video Viral

अर्जुनने पुराव्यानिशी कोर्टात उघड केला साक्षीचा खोटेपणा; "आता त्या तन्वीला पण.." प्रेक्षकांनी केली मागणी

Latest Maharashtra News Updates : रमी खेळण्याचा विषय का लांबवला जातोय मला कळत नाही- कृषीमंत्री कोकाटे

SCROLL FOR NEXT