पुणे

हिंजवडीतील प्रश्‍नांसाठी आता व्यासपीठ

CD

पुणे, ता. २२ : हिंजवडीतील माहिती-तंत्रज्ञान पार्क (आयटी पार्क) आणि परिसरातील प्रश्‍न तातडीने मार्गी लावण्यासाठी तेथील कंपन्या, नागरिक संघासह सर्व यंत्रणांच्या प्रतिनिधींचा व्हॉट्‌सॲपवर प्लॅटफॉर्म (व्यासपीठ) तयार करावा. त्यावर कंपन्यांकडून जे प्रश्‍न, समस्या मांडण्यात येतील, ते तातडीने सोडविण्याचा निर्णय मंगळवारी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तसेच, विभागीय आयुक्त स्तरावर दर १५ दिवसांनी त्याबाबत आढावा घेण्याचेही ठरले.
हिंजवडीतील आयटी पार्क परिसरातील प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित यंत्रणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची मंगळवारी बैठक झाली. या वेळी ‘पीएमआरडीए’चे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि ‘पीएमआरडीए’कडून मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनांनुसार कामकाज सुरू आहे की नाही, याचा आढावा घेण्यात आला. तसेच ही कारवाई सातत्याने सुरू ठेवण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी सर्व यंत्रणांना दिल्या.

सर्वच अतिक्रमणे काढणार
हिंजवडी परिसरात गेल्या १५ दिवसांत १६६ अतिक्रमणे पीएमआरडीएकडून पाडण्यात आली. या भागातील सर्वच अतिक्रमणे काढण्यात येणार असून, त्यादृष्टीने सर्वेक्षण सुरू केले आहे. अनधिकृत बांधकामांना नोटिसा देण्यात येत असल्याची माहिती डॉ. म्हसे यांनी दिली.


कामांमध्ये दुर्लक्ष केल्यास कारवाई
हिंजवडी परिसरातील प्रश्‍नांबाबत सरकार गांभीर्याने लक्ष ठेवून आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी वेळेमध्ये कामे पूर्ण करावीत, अशा सूचना डॉ. पुलकुंडवार यांनी दिल्या. मात्र यंत्रणांकडून कामांमध्ये दुर्लक्ष होत असेल आणि रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण केली नसल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर जिल्हाधिकाऱ्यांकडून आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

सर्वेक्षणाची ठिकाणे
१) शिवाजी चौक ते स्मशानभूमी रस्ता
२) शिवाजी चौक ते वाकड रस्ता
३) शिवाजी चौक ते फेज १ रस्ता
४) हिंजवडी, माण, मारूंजीसह इतर परिसरात सर्वेक्षण सुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND 4th Test: 'गिलने आज कर्णधार म्हणून आदर मिळवण्याची संधी गमावली', करुण नायरला वगळल्याने माजी खेळाडू बरसला

Pune News : सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे स्वातंत्र्यदिनी होणार उद्‍घाटन

Vande Bharat Train: वंदे भारतमध्ये २७ जुलैपासून होणार बदल, प्रवाशांना होणार फायदा; वाचा सविस्तर

Karad News : मराठी-हिंदी भाषेवरुन मंत्री मंगलप्रभात लोढांचा ठाकरे बंधुना खोचक टोला, म्हणाले...

Latest Maharashtra News Updates: शिळोणा घाटात रात्री अस्वलाचा वावर

SCROLL FOR NEXT