पुणे

दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार

CD

पुणे, ता. २४ ः शहरासह दिवसभर ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. ग्रामीणमधील काही भागात मध्यम सरी पडल्या. जिल्ह्यातील कुरवंडे येथे सर्वाधिक ३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यात आकाश सामान्यतः ढगाळ राहील, तर पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडतील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

मागील दोन दिवसांपासून शहरासह उपनगरात पावसाच्या हलक्या सरींना सुरुवात झाल्यामुळे कमाल व किमान तापमान २८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले, तर रात्री हवेत गारवा वाढला असून, शहर परिसरातील मगरपट्टा येथे गुरुवारी २७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पाषाण येथे २४.७ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेले. दरम्यान, सायंकाळपर्यंत शहरातील पाषाण, हडपसर, कोरेगाव पार्क येथे एक मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

घाट विभागात पावसाचा जोर वाढला
पुणे जिल्ह्यातील घाट विभागात पावसाचा जोर वाढला असून, गेल्या २४ तासांत ताम्हिणी घाटमाथ्यावर सर्वाधिक ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर लोणावळा परिसरात ४२, आंबवणे येथे ६५, मुळशी परिसरात ३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान, पुढील २४ तासांसाठी घाटमाथ्यावर अतिमुसळधार तर काही ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवीत पुणे वेधशाळेकडून ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flipkart Sale: 'फ्लिपकार्ट'चा नवीन सेल! स्मार्टफोन, एसी, टीव्ही ते फ्रिजपर्यंत भरपूर काही मिळणार स्वस्त

Pune News: बारामतीकरांसाठी महत्त्वाची बातमी! आता कचरा कराल तर...; प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Viral Video: चालत्या दुचाकीवर महिलेनं केली व्यक्तीची धुलाई, व्हिडिओ तुफान व्हायरल, प्रकरण काय?

Katraj News : आंबेगावमधील विद्यार्थ्यांचा मलेशियात डंका; आंतरराष्ट्रीय अबॅकस ओलंपियाड स्पर्धेत चार जणांचे यश

मुंबई-पुणे 'एक्स्प्रेस वे'वर भीषण अपघात! सात ते आठ वाहनं एकमेकांना धडकली, एका महिलेचा मृत्यू

SCROLL FOR NEXT