पुणे

समाजाचा विकास ऊर्जेशी निगडित

CD

पुणे, ता. २५ ः ‘‘ऊर्जा स्रोत मर्यादित आहेत. समाजाचा विकास हा ऊर्जेशी निगडित असून, अक्षय ऊर्जा स्रोतांतून निर्माण होणारी ऊर्जा साठविण्यासाठी बॅटरी हा एकमेव पर्याय आहे. सध्या बॅटरीमध्ये लिथियम हा महत्त्वाचा घटक असून, त्याचे उत्पादन भारतात होत नाही. मात्र, सोडियम जगभरात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यातील संशोधनात यश मिळाल्यास ऊर्जा क्षेत्रात मोठे बदल होतील,’’ असे मत भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेचे (आयसर) संचालक प्रा. सुनील भागवत यांनी व्यक्त केले.
एसएई इंडिया, आयआयएसईआर, एआरएआय, विग्यानदीप फाउंडेशन, एलडब्ल्यूटी, टीसीजी स्क्रीट आणि टेक्नोव्हीएस यांच्यातर्फे ‘इमर्जिंग बॅटरी टेक्नॉलॉजीज : इंडियन कॉन्टेक्स्ट फॉर कमर्शियलायझेशन’ ही शाश्‍वत विकास राष्ट्रीय परिषद नुकतीच झाली. त्या वेळी प्रा. भागवत बोलत होते.
या परिषदेत केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या सल्लागार डॉ. अनीता गुप्ता, एआरएआय पुणेचे संचालक डॉ. रेजी मथाई, केपीआयटीचे अध्यक्ष डॉ. रवी पंडित, एलडब्ल्यूटी समूहाचे अध्यक्ष श्रीकांत मराठे, टीसीजी क्रेस्टचे संचालक प्रा. सतीशचंद्र ओगले यांनी भाग घेतला.
डॉ. पंडित म्हणाले, ‘‘सध्या लिथियम बॅटरीचे युग असून, चीन याबाबत खूप पुढे आहे. ध्येयधोरण, तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्राने मिळून काम केले तर या क्षेत्रात आपल्याला आंतरराष्ट्रीय नेतृत्व मिळू शकते. सरकारदेखील याबाबत प्रयत्नशील असल्याचे दिसते.’’ सूत्रसंचालन अपर्णा देशपांडे यांनी केले, तर मोहन पाटील यांनी आभार मानले.
--------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates: प्रांजल खेवलकरच पार्टीचे आयोजक - महाजन

Women's Chess World Cup : दिव्या-हंपी पहिला डाव बरोबरीत, महिला विश्वकरंडक बुद्धिबळ; दोघींनीही वर्चस्वाची संधी गमावली

Nagpanchami Special Recipe: नागपंचमीला घरच्या घरी बनवा पौष्टिक ज्वारीच्या लाह्या, लगेच लिहून घ्या रेसिपी

प्लीज वाचवा! बँकेतून ९ लाख काढताच तरुणाचं कारमधून अपहरण, २ किमीवर फेकून दिलं; मदतीसाठी ओरडताना बघ्यांनी VIDEO काढला

दारू ड्रग्ज हुक्का...! पुण्यातल्या रेव्ह पार्टीत बड्या राजकीय नेत्याचा पती सापडला! २ महिलांसह ५ पुरुषांना घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT